JM Road
JM Road sakal
पुणे

JM Road: भुयारी मार्ग बंद असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

समाधान काटे

शिवाजीनगर : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने शाळा महाविद्यालये सुरू झाले आहेत. शिवाजीनगर भागात बऱ्याच प्रमाणात शैक्षणिक संस्था असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वर्दळ असते. जंगली महाराज रस्त्यावर असलेला जी.एम.भुयारी मार्ग बंद असल्याने शिवाजीनगर गावठाण, महापालिकेच्या समोर असलेले बसस्थानकाकडे जाण्यासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना रस्सा ओलांडावा लागतो.

शिवाजीनगर भागातून येणारी अनेक वाहने जंगली महाराज रस्त्यावरून डेक्कन कडे जात असताना सिंग्नल सुरू होण्याच्या अगोदरच घाईगडबडीत धावतात. शाळा, महाविद्यालये भरण्याची व सुटण्याची वेळ तसेच विविध कार्यालयात कामानिमित्त या रस्त्यावरून जाणाऱ्या- येणाऱ्यांचा वेळ सकाळी व सायंकाळी जवळपास तोच असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावरून होत असते. जेष्ठ नागरिक, महिला यांना रस्ता ओलांडताना अडचणी येत असल्याने हा भुयारी मार्ग सुरक्षा व्यवस्था तैनात करून लवकर खुला करावा अशी मागणी नागरिक, विद्यार्थी करत आहेत.

या संदर्भात महापालिका प्रशासनाने या भुयारी मार्गात असलेले व्यापारी गाळे, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता इत्यांदीची पाहणी करून देखाभाल दूरूस्ती केली जाईल व भुयारी मार्ग खुला केला जाईल असे सांगण्यात आले.

रस्ता ओलांडताना अपघात होऊ नये म्हणून विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांच्या वापरासाठी तो भुयारी मार्ग बांधण्यात आला होता.तो मार्ग कित्येक वर्षे झालं बंद असल्याने रस्ता ओलांडताना नागरिकांची गैरसोय होते. भुयारी मार्ग सुरू केला तर शाळेतील मुलांना, जेष्ठ नागरिकांना त्याचा फायदा होईल.

- पालक शाम हर्षे शिवाजीनगर गावठाण

स्वच्छता,वीज,सी.सी.टी.व्ही, सुरक्षा रक्षक इत्यादी सुविधा देऊन भुयारी मार्ग सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू करायला हवा.पूर्वी सुरक्षा व्यवस्था नसल्याने सदरील भुयारी मार्गात मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना आहेत.रात्री भुयारी मार्गात गुंडांचे साम्राज्य असते त्यामुळे सुरक्षा व्यवस्था करुन रात्री नऊ वाजेपर्यंत भुयारी मार्ग सुरू करावा.

- डॉ.गजानन एकबोटे कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT