पुणे

पत्रकार हल्ला

CD

PNE26W44555
अहिल्यानगर ः पत्रकार हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

पत्रकार हल्ला प्रकरणातील तिघे गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहिल्यानगर, ता. २४ ः पत्रकार सुशील थोरात यांच्यावर जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तिघा आरोपींना संभाजीनगगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या गुन्ह्यातील अन्य आरोपी अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

हेमंत ऊर्फ सोनू दत्तात्रय कोहक (वय २७, रा. सनफार्मा शाळेसमोर, बोल्हेगाव, ता. जि. अहिल्यानगर), महेश ऊर्फ पप्पू दशरथ मते (वय २७, रा. नम्रता कॉलनी, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर) व प्रशांत शिवाजी निक्रड (वय २५, रा. तागडवस्ती, पाईपलाईन रोड, सावेडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

थोरात यांनी विरोधात बातमी लावल्याच्या रागातून आरोपींनी १५ ते २० जणांच्या टोळक्यासह थोरात व त्यांच्या मुलाला मारहाण केली होती. आरोपी सोनू कोहक याने थोरात यांच्या कारला मोपेडने धडक दिली होती. त्यानंतर त्यांनी ही मारहाण केली. पाइपलाइन रोड येथे २० आॅगस्ट रोजी हा प्रकार घडला होता. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपी हल्ला करून फरार झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मुटकुळे यांच्या पथकाने गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
सुरुवातीला आरोपी राजगुरूनगर (पुणे) येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने संबंधित ठिकाणी त्यांचा शोध घेतला. परंतु आरोपी तेथून पसार झाले होते. दरम्यान, आरोपी सोनू कोहक हा त्याच्या साथीदारासह वाळूज (छत्रपती संभाजीनगर) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघा आरोपींना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास जाधव, संदीप दरवडे व पोलिस अंमलदार संदीप पवार, योगेश भिंगारदिवे, अतुल लोटके, शाहीद शेख, राहुल द्वारके, फुरकान शेख, विजय ठोंबरे, सुनील मालणकर, भगवान थोरात, प्रशात राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---
आरोपी सराईत गुन्हेगार

ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी थोरात यांना मारहाण केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. आरोपी हेमंत दत्तात्रय कोहक व प्रशांत शिवाजी निक्रड हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पाइपलाइन रोड परिसरातही या आरोपींची मोठी दहशत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

Wai Tree Transplantation: कुऱ्हाड थांबली, वृक्षांना मिळाले नवजीवन! वाईत ४० वर्षे जुन्या १९ वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वी

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

SCROLL FOR NEXT