पुणे

नागापूरमध्ये वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला मारहाण

CD

निरगुडसर, ता.२१ : आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे जमिनीच्या वादाचे चित्रीकरण व वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. बुधवारी (ता. १९) घडलेल्या या प्रकरणी पारगाव पोलिसांनी चौघांविरुद्ध गुरुवारी (ता. २०) गुन्हा दाखल केला आहे.विश्वजित अनंथा गवारी (वय ३५, रा. मंचर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिपाली राजेंद्र बगाटे, मुकुंद सावळेराम पोहकर, शिवाजी किसन बगाटे आणि कुंडलिक मोतीराम बगाटे (सर्व रा. नागापूर) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गवारी हे नागापूर येथील बाळू पोहकर यांच्या जमिनीच्या ताब्याचे चित्रीकरण करण्यासाठी गेले होते. या वेळी आरोपींनी त्यांना मज्जाव करत मारहाण व शिवीगाळ केली. ''येथे पुन्हा वार्तांकन केल्यास जीवे मारू'', अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: सणासुदीच्या काळात साखरेचे भाव गगनाला! दर नियंत्रणासाठी सरकारने उचलली कठोर पावलं; इथेनॉलमुळे खरंच भाव वाढले?

नवे-जुने मराठी चित्रपट आणि वेबसीरिज एकाच OTTवर; ‘८ वाजून १३ मिनिटे’ ते ‘कैरी’पर्यंत पाहा काय खास

Marathi News Live Updates : राहुल गांधींच्या "छात्रों की गुंज" ला "संपूर्ण वंदे मातरम्" गायनाचे मिळणार उत्तर?

कमाल अमरोहींच्या प्रेमात होत्या मधुबाला; लग्नासाठी दिलेली 'ही' ऑफर, म्हणाल्या- पत्नी मुलांना सोडून द्या, मी तुम्हाला...

Karad Crime : कऱ्हाडला महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून निर्घृण खून; खून केल्यानंतर संशयीत पोलिसात हजर

SCROLL FOR NEXT