Ravish Kumar Sakal
पुणे

Ravish Kumar : "इस शहर में मेरी एक माँ रहती है"; पुणे दौऱ्यानंतर रविश कुमार यांची भावनिक पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

भारतातील प्रसिद्ध पत्रकार रविश कुमार हे काल पुण्यात आले होते. त्यांनी पुण्यातील रस्त्यावरून जातानाचा एक व्हिडिओ आपल्या फेसबुकवरून पोस्ट केला होता. तर विशेष म्हणजे त्यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले होते. हा व्हिडिओ समाज माध्यमांत चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांची इंस्टाग्राम पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

कालच्या पुणे दौऱ्यानंतर त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी आपलं आणि पुण्याचं असलेलं कनेक्शन सांगितलं आहे. त्यांनी लिहिलंय की, "केतनची आई आजारी असल्यामुळे मला भेटायला आली नाही पण तिने लाडू बनवून पाठवले आहेत. केतनने सांगितलं की खाऊन कळवा. भारीच. पुण्यात आम्ही केतनला भेटलो. या आधीही आम्ही भेटलो होतो पण आईशी भेट नाही झाली. या लाडूमध्ये किती प्रेम आहे, मला नाही माहिती की मी किती लोकांशी जोडलेलो आहे. या शहरात माझी एक आई राहते. जेव्हा एखादा म्हणतो की काम करू नका आपापलं पाहा तेव्हा विश्वास ठेवू नका. ही गोष्ट सांगतोय यासाठी की समाज आपल्याला कसा आपला करून घेतो. लक्षात ठेवतो."

रविश कुमार हे एनडीटीव्ही मध्ये कार्यरत होते, काही दिवसांपूर्वी उद्योजक अदानी यांनी या माध्यम समूहामध्ये गुंतवणूक केल्यामुळे रविश कुमार यांनी हा माध्यम समूह सोडला. त्यांना दोनदा रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड ऑफ द इयरचा सर्वोत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 2019 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे ते पाचवे भारतीय पत्रकार ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT