सुपे, ता. २३ : सुपे (ता. बारामती) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी भरविलेल्या आनंद बाजारात सुमारे ५५ हजार रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच व्यवहार ज्ञान, गणिती कौशल्य व व्यावहारिक दृष्टीकोन विकसित व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक महादेव गायकवाड यांनी दिली. बारामती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, केंद्र प्रमुख शरद मचाले, विस्तार अधिकारी नीलिमा मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी या आनंद बाजाराचे नियोजन केले होते. या उपक्रमात खाऊ गल्लीतील विविध पदार्थांचा उपस्थित पालक व मुलांनी मनमुराद आस्वाद घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.