पुणे

कष्टकरी आईला सन्मानाने अखेरचा निरोप

CD

अंत्ययात्रेत फोडले फटाके, वाजवला बॅंड!

कष्टकरी आईला आनंदाने अखेरचा निरोप


समीर दाणी ः सकाळ वृत्तसेवा

अहिल्यानगर, ता.१७ ः गावात बॅण्ड वाजतोय, फटाके फोडले जात होते. कोणालाही ती मिरवणूकच वाटावी. मात्र, ती होती अंत्ययात्रा. आयुष्यभर कष्ट करून मुलासाठी, कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या माउलीला सन्मानाने दिलेला हा अखेरचा निरोप होता.

सावेडी गावाला सोमवारची सकाळ जरा वेगळीच अनुभवायला मिळाली. गावातील शांताबाई कारभारी काळे यांचे रविवारी (ता.१६) सायंकाळी ह्रदयविकाराने निधन झाले. बाई म्हणून परिचित असलेल्या शांताबाईंचे निधन सर्वांच चुरका लावून गेले. कारण त्यांनी आयुष्यभर केलेला संघर्ष सर्वांना ज्ञात होता. त्यांचा १९७१ मध्ये विवाह झाला. वर्षभराने मुलगा राजेंद्र यांचा जन्म झाला. सात वर्षांनंतर पतीचे अकाली निधन झाले. या प्रसंगाने दुखाःचा डोंगर त्यांच्यासमोर उभा राहिला. मात्र, शांताबाईंनी अश्रू पुसले, संघर्षाची वाट धरली. वडील आणि भावाने पाठबळ दिले. त्यांनी बेकरीत पाव भाजण्याचे काम धरले. अवघा ७० रूपये महिना. मुलाला नगरपालिकेच्या शाळेत टाकले. पुढे वडिलांचेही छत्र हरपले. तोही आधार तुटला. मग धुणे-भांड्याचे काम करावे लागले. मुलाला उच्च शिक्षणासाठी पुण्याला पाठवले. तेव्हा त्यांचा पगार ७०० रुपये होता. मुलाच्या शिक्षणासाठी त्या ५०० रुपये खर्च करीत.

मुलगाही चिकाटीने शिकला. सीए झाला. शांताबाईंनी पंचवीस वर्षे उराशी बाळगले स्वप्न पूर्ण झाले. समाजकारणात दिलेल्या योगदानामुळे राजेंद्र अहिल्यानगर सीए असोसिएशनचे अध्यक्ष झाले. सून मनिषा महापालिकेत नगरसेविका झाल्या.
.........
इन्फो
नाती झाल्या खांदेकरी
आईने आयुष्यभर कष्ट केले. सुखाचे दिवस कमीच पाहिले. मात्र, परिस्थिती बदलल्यावर सीए राजेंद्र यांनी आईला अध्यात्माची आवड असल्याने देशातील सर्वच मोठ्या धार्मिक स्थळांच्या दर्शन यात्रा घडवून आणल्या. त्यांचा अमृत महोत्सवही करायचा होता. आता ते राहून गेले. दुखःद प्रसंगातही आईची अंत्ययात्रा आनंदाने निघावी, अशी भूमिका काळे परिवाराने घेतली. नात सई व राजनंदिनी यांनी आजीच्या पार्थिवाला खांदा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज

MPSC Student Agitation : टिळक चौकातील आंदोलनाकडे नेत्यांची पाठ; उणिवा दुरुस्त करा, पण पद्धत बदलू नका; विद्यार्थ्यांची भूमिका

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT