जयवंत आवटे यांच्या
कथाकथनला प्रतिसाद
बोंडले : कथाकथनातून ग्रामीण जीवनातील गमती-जमती, कौटुंबिक नात्यांतील जिव्हाळा आणि जीवनातील वास्तव विनोदी शैलीत मांडत कथाकथनकार व व्याख्याते जयवंत आवटे यांनी विद्यार्थ्यांना मनमुराद हसविले. ‘जाणती’ या कथेतील सदा-नाग्या यांच्यातील मिश्कील संवाद आणि ग्रामीण जीवनशैलीचे चित्रण विद्यार्थ्यांच्या विशेष पसंतीस उतरले.
श्रीराम शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित श्रीराम व्याख्यानमालेच्या चौथ्या दिवशी ‘जाऊ आनंदाच्या गावा’ या विषयावर आवटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कथाकथन, विनोद, जीवनातील अनुभव आणि मार्मिक उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी आनंदी जीवनाचा अर्थ उलगडून सांगितला. कॉलेज जीवन हे उत्साह, उमेद आणि स्वप्नांनी भरलेले असते. मात्र या वयातील सळसळत्या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी संस्कार, शिक्षण आणि चांगल्या विचारांची गरज असते, असे आवटे यांनी सांगितले. शिक्षणसंस्थांनी केवळ पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर संस्कार करण्याचे काम केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसो वणवे यांनी केले. यावेळी श्रीराम शिक्षण संस्थेचे खजिनदार श्रीलेखा पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी दिनेश शिंदे, प्रमोद झगडे, डॉ. विनोद बाबर आदी उपस्थित होते. सुनंदा लोहार व मनीषा सागर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.