पुणे

मन मनास उमगत नाही : हा लोगो घ्यावा.

CD

‘मन मनास उमगत नाही’ : हा लोगो घ्यावा.
-----------------------
आपण लोकांना लगेच का जज करतो?
- नितीन फलटणकर
काल एका छोट्याशा प्रसंगाने पुन्हा एकदा विचार करायला लावलं. रस्त्याने जात होतो. समोरून एक माणूस घाईघाईने येत होता. त्याचा फोन वाजत होता. त्याने फोनकडे पाहिलं, पण फोन उचलला नाही. दोन-तीन वेळा फोन वाजला. शेवटी त्याने फोन सायलेंट केला आणि पुढे निघून गेला. माझ्या मनात पहिला विचार आला... ‘किती उद्धट माणूस आहे!’
कुणाचा फोन असेल? कदाचित घरच्यांचा. कदाचित एखाद्या गरजूचा. तरी फोन उचलला नाही. बस्स. दोन सेकंदांत मी त्या माणसाचा स्वभाव किती खराब असेल, याचा निकाल दिला. त्याला जज करत तो चांगला माणूस नसेल, असा निष्कर्ष काढला.
पण पुढे काही अंतरावर तोच माणूस एका बाकावर बसलेला दिसला. त्याने फोन काढला. स्क्रीनकडे बराच वेळ पाहिलं. मग डोळे पुसले आणि कुणाला तरी फोन केला. तो तसाच कितीतरी वेळ समोरच्या व्यक्तीशी फोनवर बोलत होता. फोन ठेवताना त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. एक विश्वास होता.
ते दृश्य पाहिलं आणि मी माझ्या निष्कर्षाला जरा आवरतं घेतलं. कदाचित त्या फोनवरचं नाव पाहण्याची त्याची हिंमत होत नसेल. कदाचित एखादी वाईट बातमी असेल. कदाचित तो स्वतःच काहीतरी कठीण प्रसंगातून जात असेल. असे अनेक कदाचित... मनात डोकावले.
आणि मग जाणवलं, आपण माणसांना किती पटकन जज करतो! एखाद्याने आपल्याला उत्तर दिलं नाही, की तो गर्विष्ठ. कुणी हसलं नाही, की तो तुसडा. कुणी आपल्याला भेटायला आलं नाही, की तो लगेच आपला विरोधक. कुणी एखादी चूक केली, की तो वाईट. कुणी आपल्या मनासारखं वागलं नाही, की लगेच ‘तो आता पूर्वीसारखा राहिला नाही’, हे लेबल आपण त्याला जोडतो.
पण गंमत बघा, आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग किंवा घटना घडल्या की, माझ्या एखाद्या कृतीमागे तत्कालीन परिस्थिती कारणीभूत आहे, असे आपण सांगतो. त्यावेळी आपली मनःस्थिती चांगली नव्हती, असे कारण आपण देतो.
मग समोरच्या व्यक्तीला आपण तीच मुभा का देत नाही? आपण स्वतः एखाद्या दिवशी त्रासात असतो. कुणाशी नीट बोलत नाही. कुणाचा फोन घेत नाही. एखाद्यावर चिडतो. तेव्हा आपल्याकडे त्याचं कारण असतं. पण दुसऱ्याने तसंच केलं, की त्याचं कारण शोधण्याआधी आपण त्याचा स्वभावदोष सांगायला लागतो. त्याच्याविषयी चार-चौघांत तो किती वाईट आहे, हे सांगायला सुरुवात करतो.
कदाचित म्हणूनच नात्यांमध्ये गैरसमज वाढतात. ते दूर करण्याचा प्रयत्न आपण कधीही करत नाहीत.
एकदा गैरसमज निर्माण झाले, की ते कसे वाढत जातात, हेही आपल्याला कळत नाही. मग तेच गैरसमज दुरावा निर्माण करतात.
म्हणून पुढच्या वेळी कुणी आपल्या अपेक्षेप्रमाणे वागलं नाही, तर लगेच निष्कर्ष काढण्याआधी एक छोटासा विराम घेऊया. स्वतःला विचारूया, त्याला जज करण्याआधी त्याची सध्याची परिस्थिती काय आहे, हे मला माहिती आहे का? तो एखाद्या संकटात तर नसेल ना? माझ्याकडून त्याच्यासोबत वागताना किंवा बोलताना काही चूक तर नाही ना झालेली? आणि त्यानंतरच आपण एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचू या.
लोकांना जज करणं खूप सोपं असतं. पण त्यांच्यावर बेतलेल्या संकटात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं खूप कठीण असतं. अशी साथ देणारे खूप कमी असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT