पुणे

पुण्यातील रिक्षाचालकांची 'जुगाड ऍम्ब्युलन्स' धावतेय मदतीसाठी

सागर आव्हाड

पुणे : संपूर्ण जगात सध्या कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले आहे. देशात सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतेचं वातावरण आहे. महाराष्ट्रात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 31 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, या कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सामान्य फेरीवाले, रिक्षावाले अशा लोकांचे हाल सुरु आहेत. मात्र, या परिस्थितीतही मार्ग काढून संकटाला टक्कर देण्याचा प्रयत्न लोक करत आहेत. अशाच एका सकारात्मक पुढाकाराचे हे उदाहरण!

जगात लोक अनेक प्रकारचे जुगाड करतात, त्यात पुण्यातल्या 'बघतोय रिक्षावाला' फोरमकडून कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी 'जुगाड ऍम्ब्युलन्स' ही नवीन संकल्पना सुरू केली आहे. कोरोनामुळे आज रिक्षा चालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिक्षाचे हप्ते भरायचे तसेच घर चालवायचे कसे? असे दररोज सतावणारे प्रश्न आ वासून उभे आहेत. या सर्व प्रश्नांना सोडवण्यासाठी ही 'जुगाड ऍम्ब्युलन्स' संकल्पना फायदेशीर ठरणार आहे. रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलिंडर बसवून ज्या रुग्णांना सिलेंडरची गरज आहे. त्या रुग्णांना या ऑक्सिजन सिलिंडरमधून देता येऊन रुग्णाचा प्राण वाचवणे सोपे जाईल. विशेष म्हणजे हे ऑक्सिजन सिलिंडर रिक्षा चालक वर्गणी काढून बसवत आहेत. आम्ही कोणाकडून ही पैसे घेत नाही, मात्र ऑक्सिजन, मास्क या किटचे जे पैसे असतील तर घेतो.

''हा ऑक्सिजन सिलिंडर बसवायला दहा हजार रुपये खर्च इतका खर्च येतो. या संघटनेकडून ही सेवा रुग्णांना मोफत दिली जाते. मात्र, रुग्णांकडून स्वखुशीने रिक्षा चालकाला भाडे दिले जाते किंवा ज्याची परिस्थिती नाही अशा रुग्णांना मोफत सेवा देणार असल्याचेही 'वाट बघतोय रिक्षावाला' फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.''

- डॉ. केशव क्षीरसागर, संस्थापक, बघतोय रिक्षावाला फोरम

कोरोनाच्या संकटाच्या काळात सामान्यांना जेवढी मदत करणे शक्य होणार तेवढी मदत करणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले आहे. या कोरोनाच्या काळात ही 'जुगाड ऍम्ब्युलन्स' संकल्पना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. ही ऍम्ब्युलन्स सेवा मिळवण्यासाठी 9657289411 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT