Sanjay Raut esakal
पुणे

Pune News : संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकरसह चारजणांविरुध्द गुन्हा

जंबो कोविड सेंटर निविदा प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोविड काळात बनावट पार्टनरशिप डिडद्वारे जंबो कोविड सेंटरची निविदा मंजूर करवून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चारजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

त्यात खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांचा समावेश आहे. याप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही पोलिसांकडे तक्रार देऊन त्यात १०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.

या संदर्भात पीएमआरडीएचे कार्यकारी अभियंता राजू लक्ष्मण ठाणगे (वय ४७) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २६ ऑगस्ट २०२० ते ९ सप्टेंबर २०२० या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात शहरात आरोग्य सुविधा अपुऱ्या होत्या. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी युद्धपातळीवर कोविड रुग्णालय उभारणीसाठी मंजुरी दिली होती. खासदार राऊत यांचे निकटवर्तीय पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटलला शिवाजीनगर येथील सीओईपी मैदानावर कोविड जंबो सेंटरची उभारणी आणि चालविण्याचे कंत्राट दिले.

परंतु आरोपींनी जंबो कोविड सेंटरच्या निविदा प्रक्रियेत निवड होण्यासाठी बनावट पार्टनरशिप डीड तयार केले. त्यामुळे पीएमआरडीएची फसवणूक झाली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार, आठशे बेडसाठी निश्चित केलेल्या कोविड रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय तज्ज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध नव्हते.

रुग्णांना नाश्ता व भोजन वेळेत मिळत नव्हते, अशा तक्रारी कोविड सेंटरबाबत महापालिकेकडे येत होत्या. त्यावर महापालिका आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच, सेवेतील त्रुटींमुळे पीएमआरडीएने लाइफलाइन हॉस्पिटलची सेवा खंडित केली होती.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यात त्यांनी आरोपींकडून पीएमआरडीएकडे सादर केलेल्या भागीदारी पत्रांमध्ये तफावत असल्याचे म्हटले होते. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT