jumbo covid hospital pune sakal
पुणे

जम्बो रुग्णालयातील खाजगी संस्थांना वैद्यकीय सेवेस तीन महिने मुदतवाढ

जम्बो रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, औषध पुरवठा, स्वच्छता यासाठी काम करणाऱ्या संस्थांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावरील महापालिकेचे जम्बो कोविड रुग्णालय सज्ज झाले असून, तेथील वैद्यकीय सेवा, औषध पुरवठा, स्वच्छता यासाठी काम करणाऱ्या संस्थांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज (ता. ११) स्थायी समितीत घेण्यात आला.

जम्बो रुग्णालयात एकूण ८०० बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी ६०० ऑक्सिजन बेड, १०० आयसीसू बेड आणि १०० एचडीयू बेड्सचा समावेश आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी या रुग्णालयाला मुदतवाढ देण्यात आली होती. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला होता, त्यास मान्यता दिल्याचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मेडबोज हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडून खाटा आणि उपचाराचे व्यवस्थापन केले जाते. त्यांना एका ऑक्सिजन बेडसाठी १ हजार ४०४ रुपये, आयसीयू बेडसाठी ४ हजार ३८५ रुपये, एचडीयू बेडसाठी ३ हजार ८४३ रुपये आणि कोविड केअर सेंटरसाठी प्रत्येकी ९५० रुपये दिले जातात. दीपाली डिझार्इन्स अँड एक्झिबीटस कंपनीकडून मूलभूत सुविधा पुरविणे, स्वच्छता आणि सुरक्षा यंत्रणा घेतली आहे. त्यासाठी प्रति महिना १ कोटी ८८ लाख रुपये दिले जाणार आहेत.

जे. एस. के. मेडिकल सिस्टिमकडून बायोमेडिकल उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. मेडब्रोज हेल्थकेअरने नियुक्त केलेल्या सीर्इओपी जम्बो कोविड सेंटर इमर्जन्सी सर्व्हिसेस कंपनी औषधाचा पुरवठा करीत आहे. जेनेरिक औषधांच्या छापील किमतीवर ७७ टक्के आणि बॅण्डेड औषधांच्या छापील किमतीवर ३६ टक्के सवलत दिली जाते.

कोविड १९ अंतर्गत जम्बो रुग्णालयासाठी करण्यात आलेल्या पंचाहत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीतून हा खर्च केला जाणार आहे, असे रासने यांनी सांगितले.

सध्या १००बेड तयार

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जम्बो रुग्णालय सज्ज केले आहे. त्यामध्ये ८०० पैकी १०० बेड तयार ठेवले आहेत. त्यामध्ये ८० बेड आॅक्सिजनचे तर २० आयसीयू बेड आहेत. इतर रुग्णालयांमध्ये बेड रिकामे असल्याने हे रुग्णालय सुरू केलेले नाही, असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT