juna wada caught fire near bhau rangari ganpati pune Sakal
पुणे

Pune Fire Accident : कशी लागली भाऊ रंगारी गणपतीसमोरील जुन्या वाड्याला आग?

बुधवार पेठेतील श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंदिरासमोरील जुन्या वाड्याला लागलेल्या आगीत ट्रॉफी आणि इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेत जीवितहानी झाली नाही.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : बुधवार पेठेतील श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंदिरासमोरील जुन्या वाड्याला लागलेल्या आगीत ट्रॉफी आणि इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेत जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही. ही घटना मंगळवारी (ता. १६) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

मंदिराजवळ गल्लीत अनेक दुकाने आहेत. येथील सूर्यकुमार देवरूखकर यांच्या वाड्याला दुपारी अचानक आग लागली. या वाड्यात कुणीही राहात नव्हते. परंतु या वाड्यातील खोल्यांमध्ये बक्षीसे, लाकडी आणि पितळेच्या ट्रॉफी मोठ्या प्रमाणावर होत्या.

आग लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट उडाली. अग्निशमन दलाच्या कसबा मध्यवर्ती केंद्र आणि एरंडवणा केंद्रातून तीन बंब आणि पाण्याचे तीन टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अरुंद गल्लीत बंब पोहचण्यास अडथळा येत होता.

जवानांनी प्रयत्न करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. परंतु सायंकाळी सहा वाजेपर्यंत आग धुमसत होती. मोठ्या प्रमाणावर धूर निघत होता. त्यामुळे जेसीबीच्या मदतीने वाड्याचा काही भाग पाडण्यात आला. जवानांनी पुन्हा पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

अग्निशामक दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगड, फायर स्टेशन अधिकारी कमलेश चौधरी, पंकज जगताप, पोलिस उपनिरीक्षक संतोष मोरे, तसेच फायरमन संजय गायकवाड, समीर शेख, सतीश ढमाले,

समीर दळवी, मयूर देशमुख, सुमीत खरात, शफीक सय्यद, अनंत जाधव, सचिन अहिवळे, शरद गोडसे, शैलेश दवणे, आशुतोष पिंगळे, कमलेश माने आदी कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.

वाड्यातील देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती होती. ‘गणपती बाप्पाला बाहेर आणा’ अशी विनंती करण्यात आली. जवानांनी आग काही प्रमाणात आटोक्यात आल्यावर मूर्ती सुरक्षितपणे बाहेर आणली. देवरूखकर कुटुंबीय काही ट्रॉफी वाचतील, यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु ट्रॉफी आणि इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : महिलांच्या शोषणासाठी अशोक खरातला आयोगाच्या अध्यक्षांचेच अभय ? रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दाव्याने खळबळ

'मी दारु पिणं सोडलं, कारण...', भारतीय स्टार क्रिकेटरने IPL 2026 पूर्वी घेतला मोठा निर्णय; सर्वकाही स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update : बारामतीत युगेंद्र पवारांनी साजरा केला गुढीपाडवा; “मिस यू अजित काका” म्हणत केली भावनिक पोस्ट

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरांनी दिली गुडन्यूज, गुढीपाडव्याच्या दिवशी पोस्ट शेअर करत म्हणाले...

T20 World Cup विजयानंतर अजित आगरकरची BCCI कडे मोठी मागणी! त्याच्या कार्यकाळात जिंकल्या ३ ICC स्पर्धा, आता म्हणतोय...

SCROLL FOR NEXT