metro 
पुणे

#PuneMetro मेट्रोसाठी आता जूनचा मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गावरील आनंदनगर (आयडीएल कॉलनी) ते गरवारे महाविद्यालय आणि आरटीओ कार्यालय ते येरवडा या टप्प्यांतील प्रत्येकी पाच किलोमीटरचे काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण होईल. या टप्प्यांवरील प्रवाशांना येत्या जूनपासून मेट्रोतून प्रवास करता येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

 याआधी शहरात मेट्रो डिसेंबरमध्ये धावेल, असा दावा करण्यात आला होता. शहरातील विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आढावा महापौरांसह महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतला. उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते धीरज घाटे, आयुक्त सौरभ राव यांच्यासह विभागप्रमुख या वेळी उपस्थित होते. त्या वेळी वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गाच्या कामाची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याचा आधार घेत महापौरांनी मेट्रोचा मुहूर्त जाहीर केला. 

महापौर म्हणाले, ‘‘पिंपरी-स्वारगेट या मेट्रो मार्गावरील शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या रोज १२ मीटर लांबीचे काम पूर्ण होत आहे. त्याशिवाय नागरिकांच्या मागणीनुसार ८० ते ८५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा महामेट्रो तयार करीत आहे. वनाझ ते नियोजित शिवसृष्टीपर्यंत मेट्रो नेली जाणार आहे आणि शिवसृष्टीही लवकरच मार्गी लागेल. याचबरोबर ‘पीएमपी’च्या बसगाड्या वाढविण्यात येणार आहेत.’’    

वेगाने कार्यवाहीच्या सूचना 
नदीसुधार (जायका) आणि शहरांतर्गत उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत; तसेच तळजाई ते सिंहगड रस्ता आणि कोथरूड ते पाषाणपर्यंतच्या बोगद्याच्या कामांना चालना देण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाबाबतच्या राज्य सरकारच्या आक्षेपवरही महापालिका लवकरच खुलासा करणार आहे. 

कामे रेंगाळण्यास जबाबदार कोण? 
महापालिकेत सत्ता आल्यानंतर जाहीर केलेली सर्व कामे पूर्ण होत नसली, तरी बहुतांशी कामे प्रगतिपथावर आहेत, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले. मात्र, गेल्या तीन वर्षांत योजना रेंगाळल्याची जबाबदारी सत्ताधारी की प्रशासनाची, या प्रश्‍नाचे उत्तर देणे मोहोळ यांनी टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT