पुणे

ज्युनिअर आंत्रप्रेन्युअर कार्यशाळा

CD

पुणे, ता. ८ : नवीन उद्योग सुरू करणाऱ्या व्यक्तीस आंत्रप्रेन्युअर म्हटले जाते. आजच्या धावपळीच्या युगात, जिथे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जगभरातील सीमांना पार करता येते, तेथे उद्योजकता ही एक महत्त्वाची आणि प्रेरणादायक दिशा बनली आहे. या पार्श्वभूमीवर १२ ते १८ वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी ज्युनिअर आंत्रप्रेन्युअर ही चार तासांची कार्यशाळा १५ मे रोजी आयोजिली आहे. उद्योजक होण्यासाठी संधी ओळखणे, समस्या सोडवणे आणि नेतृत्व क्षमता दाखवणे हे गुण महत्त्वाचे आहेत. यासाठी या कार्यशाळेत उद्योजकीय मानसिकता, स्टार्टअप प्रक्रियेची माहिती, व्यवसाय सादरीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

व्यावसायिक लोणचे कार्यशाळा
महाराष्ट्रीय जेवणामध्ये लोणच्याला विशेष महत्त्व आहे व विविध प्रकारच्या लोणच्यांना खूप मोठी बाजारपेठ आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक पद्धतीने लोणचे कसे तयार करावे याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १६ मे रोजी आयोजिली आहे. यामध्ये आंबा, लिंबू, मिक्स, मिरची, आवळा, तिखट लिंबू, हळद, चिंच, लसूण, गावरान, राजस्थानी, लिंबू चुन्दा, आंबा चुन्दा, ड्रायफ्रूट, खजूर, टोमॅटो, हैदराबादी, कारले, अंबाडी इत्यादी प्रकारचे लोणचे प्रात्यक्षिकासह शिकविणार आहे. यासह कार्यशाळेत लोणच्याच्या व्यावसायिक पद्धती, लोणचे साठविण्याची व टिकविण्याची प्रक्रिया त्याचप्रमाणे ब्रॅण्डिंग, कॉस्टिंग, पॅकिंग व बाजारपेठेविषयी मार्गदर्शन होईल.

आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १६ मेपासून सात दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण आयोजिले आहे. यात एक्झिम धोरण, इन्कोटर्मस, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजनांवर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटींच्या कौशल्यापासून कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या बाबींचा प्रशिक्षणात समावेश आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT