पुणे

आदेश आले... अंमलबजावणीचे काय

CD

आदेश आले... अंमलबजावणीचे काय?

साताऱ्यात शाळा परिसरातील जंकफूडची विक्री सुरूच; ‘एफडीए’चे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. २५ : शालेय विद्यार्थ्यांच्‍या आरोग्‍यास प्राधान्‍य देण्‍यासाठी शाळा परिसरातील जंकफूड विक्री रोखण्‍यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्‍या आदेशाची सातारा परिसरात प्रभावी अंमलबजावणी अद्यापही सुरू झालेली नाही. यामुळे अजूनही अनेक विद्यार्थ्यांच्या हातात चटपटीत खाद्यपदार्थांची पाकिटे दिसत आहेत. या प्रकारामुळे आदेश आले असले तरी त्‍याच्‍या अंमलबजावणीचे काय? हा प्रश्‍न सध्‍यातरी अनुत्तरीत आहे.
शहरातील विविध शाळांच्या परिसरात शालोपयोगी वस्तूंची विक्री करणारी दुकाने आहेत. या दुकानांत नंतरच्‍या काळात चकचकीत आणि झटपट खाद्यपदार्थांच्‍या पाकिटांच्या माळा झळकू लागल्‍या. जिभेला भावणाऱ्या या पाकिटातील खाद्यपदार्थांची अल्‍पावधीतच विद्यार्थ्यांना भुरळ पडली. यामुळे अशा जंकफूडची उलाढाल दिवसेंदिवस वाढीस लागली. या दुकानांबरोबरच शाळांच्‍या परिसरात वडापावसह इतर खाद्यपदार्थांच्‍या गाड्यांचीही रेलचेल झाल्‍याने त्‍याठिकाणी सकाळ, संध्‍याकाळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होऊ लागली. धावपळीच्‍या जगात शाळेतून आलेल्‍या मुलांना पोषक खाद्य करून देणे पालकांना शक्‍य नसल्‍याने पालकही मुलांच्‍या खिशात १०, २०, ५० रुपयांच्‍या नोटा कोंबू लागले. या नोटांची मोड विद्यार्थी अशा जंकफूड खरेदीसाठी करण्‍यावर भर देतात. तुकाराम मुंढे यांच्‍या आदेशानंतर शाळा परिसरातील जंकफूडची विक्री अद्यापही जोमात आहे.
..............
असे आहे चित्र
-------------
अनंत इंग्लिश स्कूल परिसर : शाळेच्या परिसरात पाकीटबंद खाद्यपदार्थ व तयार खाद्यपदार्थांची उपलब्धता.
न्यू इंग्लिश स्कूल परिसर : विद्यार्थ्यांच्या गर्दीच्या वेळी खाद्यपदार्थांच्या विक्रीला मोठी मागणी.
महाराजा सयाजीराव हायस्कूल परिसर : शाळा सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे खाद्यपदार्थ उपलब्ध.
इतर शाळा परिसर : विविध भागांत हातगाड्या, छोटी दुकाने आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमधून वडापाव, समोसा, चिप्स, शीतपेये आदींची विक्री.
................
जंकफूडचे दुष्परिणाम
-------------
अतिरिक्त साखर, मैदामुळे वजन वाढण्याचा धोका
जास्त मीठयुक्‍त पदार्थांमुळे उच्च रक्तदाबाचा धोका
जंकफूडमुळे संतुलित आहाराकडे दुर्लक्ष
गोड पदार्थ, पेयांमुळे दातांच्या आरोग्यावर परिणाम
लठ्ठपणामुळे इतर आजारांचा धोका जास्‍तीचा
.............

आदेश कागदावरच राहणार का?

तुकाराम मुंढे यांनी दिलेल्‍या आदेशांची अंमलबजावणी सातारा येथे होत नसल्‍याचे दिसून येत आहे. साताऱ्यात शाळांच्या आसपास विद्यार्थ्यांना जंकफूड सहज उपलब्ध होत असल्‍याने आदेश कागदावरच राहणार का? हा प्रश्‍न सध्‍या अधिक गडद आहे.
........

आदेश अन् वास्तव
------------
आदेश : शाळेच्या परिसरात जंकफूडला बंदी
प्रत्यक्षात : शाळांच्या परिसरात पाकीटबंद खाद्यपदार्थांची विक्री सुरूच

आदेश : गेटपासून ५० मीटरपर्यंत विक्रीवर पूर्ण निर्बंध
प्रत्यक्षात : शाळांच्या प्रवेशद्वाराजवळच खाद्यपदार्थांची दुकाने व हातगाड्या
...........


४४६३७
सातारा : जंकफूडच्‍या पाकिटांनी शाळा परिसरात सजलेली दुकाने.
--------------------

४४६३८
सातारा : सयाजीराव शाळेबाहेर असणारे वडापावचे गाडे.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : मॉर्निंग वॉकला जाताय, सावधान! पुण्यात रिक्षाचालकाने ज्येष्ठ नागरिकाची ७० हजारांची सोन्याची चैन पळवली

leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT