जुन्नर sakakl
पुणे

जुन्नर : विद्युत तारांमुळे लागलेल्या आगीत 8 वर्षाची चिमुकली भाजली

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : आदिवासी भागातील केळी ता.जुन्नर (junnar) येथे विद्युत वाहक तारांच्या घर्षणामुळे रविवार ता.८ रोजी आजी समवेत शेतात असलेली आठ वर्षे वयाची चैताली अशोक लांडे ही लहानगी भाजून जखमी झाल्याची घटना घडली आहे. (junnar 8 year old girl burnt fire caused electrical wires)

शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीच्या तारांचे घर्षण झाल्याने जाळ होऊन आगीचे लोळ खाली पडले. यात चैताली भाजली आहे. जुन्नर येथील मोकाशी जनरल हॉस्पिटलमध्ये तिला उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेत चैतालीच्या पाठीचा तसेच हाताचा भाग भाजला आहे. सुमारे ३० टक्के अंग भाजले असल्याचे सांगण्यात आले.

पंचायत समिती सदस्य काळू गागरे व ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागास हि घटना कळविल्यानंतर आपटाळे विभागाचे सहाय्यक अभियंता विकास गावंडे , वायरमन सचिन नवले व काळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. संबधित मुलीला आवश्यक मदत मिळावी यासाठी कारवाई करण्यात येत असल्याचे गागरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT