जुन्नरला प्राचीन राम मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात sakal
पुणे

जुन्नरला प्राचीन राम मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात

इंदुमती बोरकर यांनी दररोज रामचरित्र कीर्तन सादर केले.

दत्ता म्हसकर

जुन्नर: कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने यावर्षी जुन्नर शहर व परिसरातील प्राचीन राम मंदिरात मोठ्या उत्साहात भक्तिभावाने श्री रामजन्म उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. रामनवमी निमित्ताने मंदिरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. जुन्नरच्या वरली आळी येथे केशव शिवराम जोशी उर्फ-भवाळकर यांचे १३८ वर्षांचे जुने राममंदिर आहे. आत आकर्षक लाकडी कोरीव काम आहे. तसेच ब्राह्मण बुधवार पेठेतील आदमाने याचे राममंदिरात पाडव्या पासून नवरात्रउत्सव सुरू झाल.

इंदुमती बोरकर यांनी दररोज रामचरित्र कीर्तन सादर केले. आज ता.१० रोजी रामजन्म उत्सव अतिशय जल्लोषात साजरा झाला उद्या ता.११ रोजी काल्याचे कीर्तन व नंतर महा प्रसाद आयोजित केला आहे असल्याचे मंगेश जोशी-गाजरे यांनी सांगितले.

जुन्नरच्या वरली आळी येथील मंदिरात रामनवमीच्या पूर्वसंध्येला शनिवार ता.०९ रोजी येथील कलोपासक सांस्कृतिक मंचच्या वतीने रामनामाचा जागर करण्यात आला. यावेळी स्थानिक गायक आणि वादकवृंदाने गायलेल्या राम गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. डॉ.प्रमिला जुन्नरकर,आशा देशपांडे, विजय बाळसराफ, दीपांजली मेढेकर, कृष्णा गवळी, सुधीर जोशी, उमेश लोखंडे, विनय रांजणीकर, वैशाली सावंत आदी गायकांनी स्वरसंध्येला रंगत आणली.पप्पू क्षिरसागर, दिगंबर राऊत यांनी वाद्यवृंदाची साथ दिली.कलोपासकच्या अध्यक्षा प्रा.मनीषा कोरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. दरवर्षी जुन्नरला मोठ्या उत्साहात रामजन्म उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT