crime
crime 
पुणे

शेत जमिनीच्या वादातून चुलत भावाच्या मानेवर कुऱ्हाडीने...  

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : शेत जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीचा मानेवर घाव घालून चुलत भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार जुन्नर तालुक्यातील आनंदवाडी येथे आजा सायंकाळी झाला. महेश धनराज भुजबळ (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्या खूनप्रकरणी अमोल बाळकृष्ण भुजबळ (वय २६) याच्यावर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अद्याप त्याला अटक केलेली नाही. 

याबाबत नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी माहिती दिली की, धनराज चिमाजी  भुजबळ (वय ६०) यांच्या वाट्याची वडिलोपार्जित जमीन त्यांचा भाऊ बाळकृष्ण चिमाजी भुजबळ हेच करतात. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अमोल हा चुलते धनराज भुजबळ यांच्या घरी आला. आपल्या गव्हाळीमळा येथील शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर वसंत भुजबळ यांनी खांब लावला असल्याची तक्रार त्याने चुलते धनराज भुजबळ यांच्याकडे केली. मी त्यांना सांगितले आहे, तू लक्ष घालू नको, असा सल्ला या वेळी धनराज भुजबळ यांनी अमोल याला दिला.

त्यावरून चुलते व पुतण्या यांच्यात बाचाबाची झाली. मी बघून घेतो, असे सांगून अमोल तेथून रागाने निघून गेला. त्यानंतर तो सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा आला. त्याने धनराज भुजबळ यांचा मुलगा महेश याच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. जखमी महेश याला उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद धनराज भुजबळ यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली.

महेश हा धनराज यांचा एकुलता एक मुलगा होता. तो कुरण येथील जयहिंद महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. एक वर्षापूर्वी जुन्नर रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात तो सुदैवाने वाचला होता. मात्र, या वेळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT