पुणे

दक्ष इलेव्हनला ‘शिवनेर चषक’

CD

जुन्नर, ता. १४ : जुन्नर येथे झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये मुरबाड येथील दक्ष इलेव्हन गोरसई बी या संघाने यंदाच्या वर्षीचा शिवनेर चषक पटकाविला. येथील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्याने चार दिवसीय क्रिकेट सामने झाले. या सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व सामने हे दिवस-रात्र खेळवले गेले.
शहरातील शिवनेर क्रिकेट क्लबच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये येथील विद्यालयाच्या मैदानावर क्रिकेटचे सामने भरवले जातात. गतवर्षी तालुक्यात पहिल्यांदाच दिवस- रात्र सामन्यांचे आयोजन केले. या स्पर्धांना क्रिकेट शौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने यंदाच्या वर्षीही दिवस- रात्र सामने आयोजित केले होते.
दररोज दुपारी तीन ते रात्री बारा या कालावधीत सामने झाले, तर एकूण ३२ संघ सहभागी झाले होते. शिवनेर क्रिकेट क्लबचे ॲड. प्रवीण वाघमारे, विकास वाघमारे, सतीश लोखंडे, सुनील बढे, सचिन जाधव, प्रमोद बोऱ्हाडे, अजय खोत, रोहित भालेराव आदींनी या स्पर्धांचे नियोजन केले.

अनुक्रमे स्पर्धेचे विजेते संघ :
दक्ष इलेव्हन गोरसई बी संघ (मुरबाड), मेजर गोरख शिवगिरी इलेव्हन संघ (संगमनेर), ओम साई इलेव्हन पै. नितीनतात्या वाडेकर व कैलासभाऊ निखाडे स्पोर्ट्स फाउंडेशन (खेड), टाकळी ढोकेश्वर इलेव्हन (पारनेर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैशांच्या वादातून रक्ताचा सडा! साडूनेच साडूचा केला निर्घृण खून अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; मिरज तालुक्यात खळबळ!

'संजय दत्तच्या केससाठी बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावलं अन्...' उज्ज्वल निकम यांनी सांगितला किस्सा, म्हणाले...

Jellyfish in Anjarle Sea Beach : आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढला; समुद्रात अंघोळ करताना १४ वर्षीय मुलीला स्पर्श, त्वचेवर खाज, जळजळ

Latest Marathi News Live Update: रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद मिटेना, नेमकं काय घडतंय?

PM Modi: पंतप्रधान मोदींकडे डीके शिवकुमारांनी केली 'ही' मागणी; काँग्रेसमधूनच कडाडून विरोध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT