जुन्नर : गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तरुणास अटक sakal
पुणे

जुन्नर : गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तरुणास अटक

चार लाख ७४ हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दत्ता म्हसकर

जुन्नर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तरुणास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार लाख ७४ हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात ७४ हजार ८४० रुपये किमतीचा गुटखा व चार लाखाच्या नवीन गाडीचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी दिली आहे. जुन्नर न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध गुटखा व अन्य अमली पदार्थाच्या व्यापारावर आळा घालण्यासाठी खास मोहीम राबविण्याचा आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिला होता.

त्यानुसार आज शनिवार ता. ०९ रोजी पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखा पथक खेड जुन्नर विभागात गस्त करत असताना सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार एकनाथवाडी ता. जुन्नर येथील सिबाका हॉटेलजवळ एक संशयित इसम गुटखा व पानमसाला बाळगून त्याची वाहतूक करत असल्याचे समजले.

पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली जुन्नरचे पोलीस निरीक्षक विकास जाधव,सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे,पोलीस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकिर, नाईक संदीप वारे,

*पोलिस शिपाई अक्षय नवले, निलेश सुपेकर,पोलीस मित्र प्रसाद पिंगळे,जुन्नरचे

पोलिस कर्मचारी शंकर तळपे,गणेश जोरी यांच्या पथकाने छापा टाकला असता त्यांना मनोज बाळशीराम वाणी, वय २९, रा.पिंपळगाव तर्फे नारायणगाव ता.जुन्नर

हा वाहन क्र.एम एच १४ जे एल ०४२२ या नव्या चारचाकीत बसलेला आढळून आला. त्यांचेकडे वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा आणि पानमसाला मोठ्या प्रमाणात मिळून आला.त्याचेकडील गुटखा, पानमसाला आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कार्यवाहीसाठी त्यास जुन्नर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाचे भाव वाढले! CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? पाहा महाराष्ट्रातील आजचे दर

‘ती’ पुन्हा येतेय! नजरेत तलवार, चाल अंगार, झी मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोतील ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण?

Pune Satara Highway: खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी ट्रक पलटी; दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Pakistan Match Fixing : पाकिस्तानी फिक्सर, इंग्लंड दौऱ्यावर संशयास्पद घडामोडी! फोन जप्त, PCB कडून चौकशी; खूप मोठी नावं अडकणार?

SCROLL FOR NEXT