पुणे

अवैध दारूविक्री विरोधात जुन्नर पोलिस ॲक्शन मोडवर

CD

जुन्नर, ता. २४ : जुन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात अवैध हातभट्टी आणि बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, सात आरोपींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गुंड यांनी दिली.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात गेल्या महिन्यात बनावट विषारी दारू प्रकरणात अनेकांना जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. पोलिसांनी भिवाडे खुर्द, शिरोली, धालेवाडी, कारखाना फाटा आणि गोळेगाव परिसरात छापे टाकले.
या कारवाईत लक्ष्मण निंबा शेळकंदे, एकनाथ कृष्णा शेळकंदे (दोघे रा. भिवाडे खुर्द), विशाल दिलीप शेळके (धनगरवाडी), सुधाकर भाऊराव कांबळे (पाडळी), सचिन बाबूराव पेंडे (येडगाव) आणि प्रणीत विठ्ठल देवाडे यांच्यासह सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT