Leopard Safari sakal
पुणे

Leopard Safari : जुन्नर बिबट सफारी प्रकल्पास मंजूरी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली.

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. जुन्नर परिसरातील बिबट्यांची वाढलेली संख्या पर्यटन वाढीसाठी उपयोगी असल्याचे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री पवार हे जुन्नरमध्ये बिबट सफारी सुरु करण्यासाठी आग्रही होते. त्यादृष्टीने सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा सुरु होता. आज मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने जुन्नर वनक्षेत्रातील बिबट सफारीचा मार्ग खुला झाला आहे.अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

आमदार बेनके म्हणाले, जुन्नर तालुक्यातील मौजे आंबेगव्हाण वनक्षेत्रात बिबट सफारी उभारण्यास दिलेली मान्यता ही सविस्तर प्रकल्प आराखडा तसेच प्रकल्प आराखडा मांडणी अहवालास नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मान्यतेस अधिन राहून देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या 80 कोटी 43. लाख 23 हजार रुपये खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

अशी असणार बिबट सफारी - बिबट सफारीमध्ये पर्यटक व बिबट वन्यप्राणी यांच्या सुरक्षिततेसाठी दुहेरी प्रवेशद्वार तयार करण्यात येणार असून सदर प्रवेशद्वार हे विद्युत स्वयंचलित व सेन्सर असलेले असणार आहे. सफारीमध्ये 2.6 कि.मी. लांबीचा अंतर्गत रस्ता तयार करण्यात येणार आहे.

हा रस्ता बिबट, वन्यप्राण्यासाठी तयार केलेले पाणवठे, तसेच, त्यांच्या अधिवासा जवळून जाणार असल्याने पर्यटकांना बिबट वन्यप्राणी जवळून पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. सफारीमध्ये पर्यंटकांना फिरण्यासाठी 20 ते 25 आसन क्षमता असलेल्या सुरक्षित तसेच बंदिस्त बस खरेदी कऱण्यात येणार आहेत.

सदर बस सफारी मार्गावरुन विहित वेळेत पर्यटकांसह मार्गक्रमण करतील. हा वेगळा अनुभव असणार आहे. अशी माहिती आमदार बेनके यांनी दिली.

पांडुरंग पवार (अध्यक्ष जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस) - आमदार अतुल बेनके यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, त्यांना मिळालेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ यामुळे, जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीचा आणि पर्यटनवाढीचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT