MLA Atul Benke esakal
पुणे

MLA Atul Benke : आगामी विधानसभा निवडणूक न लढविण्याची मानसिकता; तटस्थ राहण्याची घेतली भूमिका

सध्याच्या राजकीय परिस्थितीत निर्णय घेताना हृदय व डोक्याची घालमेल

रवींद्र पाटे

नारायणगाव : अनेक वर्ष राजकारण,समाजकारण करत असताना माजी आमदार वल्लभ बेनके कुटुंबाने आयुष्यभर पवार कुटुंबाशी निष्ठा जपली आहे.सध्याच्या राजकीय परिस्थितीत निर्णय घेताना हृदय व डोक्याची घालमेल झाली आहे. माझ्या हृदयात दैवत म्हणून शरद पवार तर नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारयांना स्थान आहे. माझ्या हृदयातून या दोघा व्यक्तींना मी बाजूला करू शकत नाही.

यामुळे पाठिंबा जाहीर न करता मी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक न लढविण्याची माझी मानसिकता झाली आहे.अशी भावना जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील बंडखोरी नंतर आमदार अतुल बेनके कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते.मात्र डेंगू मुळे रुग्णालयात दाखल असल्यामुळे त्यांनी भूमिका जाहीर केली नव्हती.

आज सकाळी कार्यकर्ता मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी नेते वगळता बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या बाजूने कौल दिला. आज सायंकाळी चार वाजता नारायणगाव येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार बेनके यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी आमदार बेनके भावनाविवश झाले होते. पत्रकार परिषदेला जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, विनायक तांबे, बाळासाहेब खिलारी, उपसभापती प्रकाश ताजने, गणेश वाजगे, विकास दरेकर,उज्वला शेवाळे,आरती ढोबळे आदि उपस्थित होते.

आमदार अतुल बेनके म्हणाले पवार व बेनके कुटुंबीय यांचे 45 वर्षाचे ऋणानुबंध आहेत. दोन वेळा आलेली मंत्रीपदाची संधी गेली तरी माझे वडील माजी आमदार वल्लभ बेनके यांनी पक्षनिष्ठा व शरद पवार यांची साथ सोडली नाही. सन 2004 नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. विकास कामाच्या निधीसाठी हक्काचा नेता म्हणून मला उपमुख्यमंत्री अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांची साथ मिळाली आहे.

बिबट निवारा केंद्र, बिबट सफारी डीपीआर, पिंपळगाव जोगा कालवा, किल्ले शिवनेरी विकास परिसर, रस्ते, बंधारे आदि कोट्यावधी रुपयाची विकास कामे अजित पवार यांच्यामुळे मार्गी लागली आहेत. चिल्हेवाडी पाईपलाईनच्या कामासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी निधी मंजूर केला आहे. जनतेने मला राजकारण करण्यासाठी नाही तर विकास कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. जुन्नर तालुक्यात जातीय सलोखा ठेवून सर्व जातीय धर्मीयांना समान न्याय देण्याची भूमिका माजी आमदार वल्लभ बेनके यांची राहिली आहे.

त्याप्रमाणेच माझी वाटचाल सुरु आहे.पुढील एक वर्ष माझा कार्यकाल शिल्लक राहिला आहे. या कालावधीमध्ये पूर्ण ताकतीनिशी जास्तीत जास्त विकास कामे करून जनतेची सेवा करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. शेतकऱ्यांना कुकडीचे हक्काचे पाणी देण्यासाठी माझा संघर्ष कायम राहणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आईच्या सल्ल्यानुसार मी आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक न लढविण्याच्या मानसिकतेत आहे. मात्र तालुक्याच्या जनतेने जे प्रेम दिले आहे.त्या ऋणात राहून जनतेच्या सेवेसाठी बेनके कुटुंबीय सदैव कार्यरत राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT