atul benake
atul benake 
पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या लोकप्रिय आमदारांची कोरोना चाचणी...

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात उपाययोजना करताना कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क आल्याने आमदार अतुल बेनके यांना काही प्रमाणात लक्षणे आढळून आली आहेत. सुदैवाने त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीही ११ जुलै रोजी पुन्हा कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खबरदारी म्हणून ते सात दिवस होम क्वारंटाइन राहणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी आमदार बेनके हे मार्च महिन्यापासून सातत्याने नागरिक व शासकीय अधिकारी यांच्या संपर्कात आहेत. किराणा, धान्य वाटप, चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, कोरोना रुग्णांसाठीच्या उपाययोजना, प्रशासकीय बैठका या मुळे आमदार बेनके नकळत कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत. विषाणूजन्य आजारांची लक्षणे दिसून आल्याने ६ जुलै रोजी आमदार बेनके यांची कोरोना तपासणी करण्यात आली. 

त्यांच्या कोरोना तपासणीचा पहिला अहवाल आज प्राप्त झाला. सुदैवाने अहवाल निगेटिव्ह आला आहे. सात दिवसांनी पुन्हा कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात खबरदारी म्हणून होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी आमदार बेनके यांना दिला आहे. त्यामुळे ते सात दिवस होम क्वारंटाइन राहणार आहेत.

विलगीकरण काळात मी कुणालाही प्रत्यक्ष भेटू शकणार नाही. मात्र, अप्रत्यक्षपणे सोशल मीडिया, मोबाईलच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी व नागरिक यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कार्यरत असणार आहे. कुठलेही काम थांबणार नाही, याची मी काळजी घेत आहे. तालुक्यातील सर्व घडामोडींवर माझे लक्ष आहे. तालुक्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. अनावश्यक बाहेर फिरू नये, स्वच्छता पाळा व कुटुंबियांची काळजी घ्या.
 - अतुल बेनके, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT