tourism sakal
पुणे

जुन्नर : पर्यटकांची पावसाळी पर्यटनासाठी नाणेघाटात गर्दी

दोन दिवसात चार हजार पर्यटकानी लुटला आनंद

दत्ता म्हसकर

जुन्नर : खोल दरीतून वर येणारे दाट धुके, झोबणारा गार वारा व कोसळणाऱ्या पावसाच्या सरी झेलत नाणेघाटात शनिवार व रविवारी सुट्टीच्या दोन दिवसात सुमारे चार हजार पर्यटकांनी ऐतिहासिक नाणेघाटात पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद लूटला.

घाटघर येथील उपद्रव शुल्क नाक्यावर दोन दिवसांत बाहेरगावहून आलेल्या ७३३ दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंद झाली असून या वाहनातून तीन हजार ४७८ पर्यटक आल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यापासून नाणेघाट परिसरात होत असलेल्या पावसाने पर्यटकांची पावले नाणेघाटाकडे वळू लागली आहेत. ब्रिटीश कालीन फडके बंधारा उंची वाढविल्यानंतर प्रथमच तुडुंब भरून वाहत आहे. बंधाऱ्याच्या खाली केलेल्या पायऱ्या वरून फेसाळत वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्यात बसण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. परिसरातील ओढे नाले भरून वाहू लागले आहेत.भातखाचरे पाण्याने भरली आहेत. अशा निसर्गरम्य वातावरणात फिरण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे येथून सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.

पर्यटनावरील निर्बध दूर झाल्याने वनविभागाच्या वतीने घाटघर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने रविवार ता.०३ पासून येथे उपद्रव शुल्क आकारणी सुरू केली असून सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. येथील परिसरात मद्यपानाला बंदी घालण्यात आली आहे. हुल्लडबाज पर्यटकांकडून अन्य पर्यटकांना त्रास होणार नाही याची दक्षता सुरक्षा रक्षक घेत असल्याचे वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी सांगितले.

या उपद्रव शुल्काच्या रकमेतून गावातील तरुणांना रोजगार तसेच येथील जैवविविधता जोपासण्यास व परिसर प्लॅस्टिक मुक्त करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT