narayangaon 
पुणे

शेतकऱ्यांना कोथंबिरीने हसवले, कांद्याने मात्र रडवले

रवींद्र पाटे

नारायणगाव  (पुणे) : पावसामुळे कोथंबीर व मेथीचे नुकसान झाल्यामुळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात कोथंबीर व मेथीची आवक घटली असून, बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या लिलावात कोथंबीर व मेथीच्या जुडीला शेकडा अनुक्रमे सातशे रुपये ते चार हजार रुपये,  नऊशे रुपये ते बावीसशे रुपयांदरम्यान भाव मिळाला. आळेफाटा उपबजारात डाळिंबाला प्रतिकिलो पस्तीस रुपये ते शंभर रुपयांच्या दरम्यान  भाव मिळाला.

जुन्नर, आंबेगाव तालुक्यातुन नारायणगाव उपबाजारात मंगळवारी रात्री  कोथंबीर व मेथीच्या १ लाख १५ हजार ९०० जुड्यांची आवक झाली होती. आवक घटल्याने कोथंबीर जुडीला शेकडो सातशे रुपये ते चार हजार रुपये, असा मागील सहा महिन्यातील उच्चांकी भाव मिळाला. आळेफाटा उपबजारात डाळिंबाच्या ३ हजार ९७० क्रेटची आवक झाली. प्रतवारीनुसार डाळिंबाला प्रति किलो ३५ रुपये, ७५ रुपये, १०० रुपये, असा भाव मिळाला. ढगाळ वातावरण व भूरभूर पावसामुळे डाळिंब फळांवर मोठ्या प्रमाणात करपा, फळ माशीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झाले, अशी माहिती प्रशांत महाबरे यांनी दिली.

ओतूर उपबाजारात भाजीपाल्याच्या ३ हजार ६३९ डागांची आवक झाली. वाटाणा शेंगांना प्रतवारीनुसार प्रतिकिलो ३० रुपये ते १३२ रुपये भाव मिळाला. वांगी, फ्लॉवर, हिरवी मिरची, बटाटा, काकडी, भोपळा व इतर भाजीपाल्याला प्रतिकिलो पाच रुपये ते चाळीस रुपयांदरम्यान भाव मिळाला. वाढलेला उत्पादन खर्च व उत्पादनात झालेली घट पाहता भाजीपाल्याला मिळणार भाव अतिशय कमी असल्याने भाजीपाला उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टोमॅटोचे भाव स्थिर
नारायणगाव उपबजारात १७ हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. टोमॅटो क्रेटला (२० किलो) प्रतवारीनुसार २०० रुपये ते ४७५ रुपयांदरम्यान भाव मिळाला. मागील दोन महिन्यापासून टोमॅटोचे भाव स्थिर आहेत. आळेफाटा, जुन्नर, ओतूर उपबजारात ४२ हजार ६९६ कांदा गोणीची उच्चाकी आवक झाली. प्रतवारीनुसार कांद्याला प्रति किलो एक रुपया ते दहा रुपयांदरम्यान भाव मिळाला. वातावरणात आद्रता वाढल्याने कांदा चाळीतील पन्नास टक्के कांदा खराब झाला आहे. साठवलेला कांदा सडू लागल्याने उपबजारात कांदा आवक वाढली आहे. बाजारभावाआभावी कांदा उत्पाकाची झोप उडाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT