junnar
junnar 
पुणे

जुन्नरला शिया मुस्लिम समाजाची मातम व ताबूत विसर्जन मिरवणूक

दत्ता म्हसकर

जुन्नर - मोहरम सणाचे निमित्ताने येथील शिया मुस्लिम समाजाचे वतीने सय्यदवाडा येथून मौलाना नूरअली आबेदी सय्यद यांचे नेतृत्वाखाली आज शुक्रवारी ता.21 रोजी सकाळी मातम व ताबूत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. 

गणेशोत्सव आणि मोहरम दोन्ही सण सुमारे छत्तीस वर्षानंतर एकत्र येत असल्याने यावर्षीच्या उत्सवास विशेष असे महत्व असल्याचे सांगण्यात आले. जुन्नर नगर परिषद येथे मिरवणूक आल्यानंतर नगराध्यक्ष शाम पांडे  नगरसेवक भाऊ कुंभार, समीर भगत यांनी ताबूत व पंजा यांचे पूजन केले. यावेळी येथील सदाबाजार गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि मुस्लिम समाज यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.यानंतर मातम मिरवणूक सुरु झाली. हिन्दू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या शहरात हिन्दू-मुस्लिम दोन्ही समाजातील लोक या सणाच्या निमित्ताने एकत्र आले होते. हिन्दू मुस्लिम ऐक्याचे अनुकरण सर्वानी केल्यास शांतता अबाधित राहण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त नगराध्यक्ष पांडे यांनी व्यक्त केले. पोलिस निरिक्षक यशवंत नलावडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT