Marriage Card Sakal
पुणे

Marriage Card : अबब..... शिव विवाह सोहळ्याचे ३६ पानांचे लग्नाचं आवतनं....

शिव विवाह सोहळ्याचे ३६ पानी लग्नाचं आवतनं..... प्रागतिक विचारांच्या चंद्रशेखर शिखरे परिवाराची ही आगळी वेगळी वैचारिक लग्नपत्रिका चर्चेचा विषय झाली आहे.

दत्ता म्हसकर

शिव विवाह सोहळ्याचे ३६ पानी लग्नाचं आवतनं..... प्रागतिक विचारांच्या चंद्रशेखर शिखरे परिवाराची ही आगळी वेगळी वैचारिक लग्नपत्रिका चर्चेचा विषय झाली आहे.

जुन्नर - शिव विवाह सोहळ्याचे ३६ पानी लग्नाचं आवतनं..... प्रागतिक विचारांच्या चंद्रशेखर शिखरे परिवाराची ही आगळी वेगळी वैचारिक लग्नपत्रिका चर्चेचा विषय झाली आहे.

विवाह जमवताना ३६ गुण पाहिले जातात परंतु येथे पत्रिकेमध्ये ३६ पाने ही विविध विचारक व पुरोगामी व पौराणिक ऐतिहासिक सामाजिक या विषयांवर भाष्य करणारी आहे. नातेवाईक व इतर नावांना बगल देत नवं दाम्पत्याच्या शैक्षणिक आलेखाचा सचित्र परिचय दिला आहे तर ३६ महान व्यक्तींची फोटोसह माहिती दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील मराठा सेवा संघाचे चंद्रशेखर वसंत शिखरे यांची कन्या ईशिता व बल्लाळवाडी ता. जुन्नर येथील मारुती प्रभाकर डोंगरे यांचा मुलगा मयूर यांचा शुभविवाह २३ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. पत्रिकेत वधू व वरचा फोटो व अल्प परिचय देण्यात आला आहे. ईशिका व मयूर दोघेही उच्चशिक्षित असून जर्मनी येथे उच्च पदावर कार्यरत आहेत. याच बरोबर शिखरे परिवाराचा ग्रुप फोटो व माहिती देण्यात आली आहे.

आवली व संत तुकाराम, शिव-पार्वती विवाह सावित्रीबाई व महात्मा ज्योतिराव फुले यांची माहिती तसेच जिज्ञासक महदंबा, संत जनाबाई संत मुक्ताबाई, अक्का महादेवी यांची माहिती देण्यात आली आहे. कॅप्टन लीलाताई व सेनानी डॉ. उत्तमराव पाटील जिजाऊ व शहाजीराजे, संत सोयराबाई व संत चोखामेळा, सईबाई व छत्रपती शिवराय, महाराणी देवी व सम्राट अशोक, महाराणी चिमणाबाई व सयाजीराव गायकवाड या उभयतांची तसेच ताराबाई शिंदे, डॉ. रखमाबाई राऊत, बहिणाबाई चौधरी, सरोजनी नायडू यांच्या सचित्र माहिती, संत व महात्मे यांचे प्रसिद्ध अभंग दिले आहेत.

यासाठी चांगल्या प्रतीचा कागद व आधुनिक छपाई तंत्रज्ञानाचा वापर पुणे येथील जिजाऊ प्रकाशन यांनी केला आहे. सर्वसाधारणपणे लग्नपत्रिकेत कुटुंबाची व नातेवाईकांची शुभाशीर्वाद देणाऱ्या पुढाऱ्याची नामावली असते पण ही याचा कोठेही उल्लेख नसल्याने ही पत्रिका वाचून संग्रही ठेवण्यायोग्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानमध्ये जहाजावर भारतीयाचा मृत्यू, प्लास्टिकमध्ये गुंडाळून थंड पाण्याच्या बाटल्यांनी झाकलं; मृतदेह सडू लागला, मदत मिळेना

Uddhav Thackeray: मातोश्रीवर बैठकीला ९ पैकी चौघेच आले, सर्वजण ठाकरेंसोबतच राऊतांचा दावा; तरीही ऑपरेशन टायगरची भीती

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

Pune Market Yard: पुणे मार्केट यार्डमध्ये केशर आंब्याला १६७ रुपये प्रतिकिलो भाव; पाच वर्षांतील सर्वोच्च विक्रम

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT