पुणे

जुन्नरमधील तीन मंडल क्षेत्रात अतिवृष्टी

CD

नारायणगाव, ता. २३ : जुन्नर तालुक्यातील बारा मंडल कार्यक्षेत्रात मंगळवारी दिवसभर भिज पाऊस पडला. दिवसभरात सरासरी ५४.३ मिलिमीटर पाऊस झाला. नारायणगाव, जुन्नर, ओतूर या तीन मंडल या क्षेत्रात सरासरी अतिवृष्टी झाल्याने प्रामुख्याने मेथी, कोथिंबीर, फुलकोबी, मिरची, टोमॅटो या भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नारायणगाव, जुन्नर, ओतूर या तीन मंडल या क्षेत्रातील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे उद्यापासून (ता. २५) करण्यात येणार आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिली आहे.

जुन्नर तालुक्यात मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. तालुक्यात २४ तासात सरासरी ५४.३ मिलिमीटर पाऊस झाला. नारायणगाव, जुन्नर, ओतूर या तीन मंडल या क्षेत्रात अनुक्रमे १११ मिलिमीटर, १०७ मिलिमीटर, ६९ मिलिमीटर पाऊस झाला. या तीन मंडल कार्यक्षेत्रात सरासरी ६० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याने गुरुवारपासून फळ भाजीपाला पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत. या तीन मंडल क्षेत्र गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील ग्राममहसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून पिकांच्या नुकसानीची माहिती द्यावी. पथकातील अधिकारी स्थळ भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करतील. अशी माहिती भोसले यांनी दिली.

मंगळवारी मंडलनिहाय पाऊस पुढीलप्रमाणे (कंसात एक जूनपासून झालेला एकूण पाऊस, मिलिमीटरमध्ये) :
जुन्नर : १०७.३ (१४५.८)
नारायणगाव : १११ (१५६)
वडज : ३६.३ (४५.८),
निमगाव : ४३.३ (४३.३)
बेल्हे : २३.८ (२३.८)
राजूर : ४२.३ (४२.६)
डिंगोरे : २७.५ (४२.८)
आपटाळे : ४२.३(५०)
ओतूर: ६९(१००.१)
वडज : ५८ (८३.५)
ओझर : ४८.३ (५९.४)
मढ : ४२.३ (४२.६)

बेल्हे मंडल कार्यक्षेत्रात कमी पाऊस :जून महिन्यातील तालुक्यातील पावसाची सरासरी ११५.४ मिलिमीटर आहे. जुन्नर व नारायणगाव मंडल क्षेत्रात जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मात्र बेल्हे मंडल कार्यक्षेत्रात जून महिन्यातील मागील २३ दिवसात सरासरी सर्वांत कमी २३.८ मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे या भागात खरीप पिकांच्या पेरणीसाठी पावसाची अजून गरज आहे. मात्र तालुक्याच्या मध्य भागात पेरणी योग्य पाऊस झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT