पुणे

पुणे जिल्ह्यातील 'हा' तालुका झाला कोरोनामुक्त!

दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज रविवार अखेर गेल्या दोन महिन्यात कोरोनाबाधित एक रुग्ण आढळून आला असून, तो उपचारानंतर पूर्णपणे बरा झाला आहे. आज अखेर तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी सांगितले.

पहिल्या लॉकडाऊननंतर मुंबईहून डिंगोरे ता.जुन्नर येथे गावी आलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीमुळे त्याचे घरातील एकास कोरोनाची लागण झाली. मात्र, उपचारानंतर ही व्यक्ती पूर्णपणे बरी झाली आहे. त्या रूग्णाच्या संपर्कातील १७ जणांची तपासणी करण्यात आली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, रूग्णाची आई पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डिंगोरे, उदापूर व ओतूर तिन्ही गावच्या सरपंचाना याबाबत माहिती देऊन प्रतिबंधक कारवाई म्हणून गाव व परिसरात औषध फवारणी करण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरिकांना घरातच राहून कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तीन किलोमीटर परिसर प्रतिबंधित तर पाच किलोमीटर बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सदर रूग्ण व त्याचा भाऊ हा कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. आजपर्यंत संशयित 101 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, सर्व तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran War Impact: 'Strait of Hormuz' म्हणजे काय? भारतासाठी इतका महत्त्वाचा का? हा मार्ग बंद झाला तर महाग होईल तुमचं जेवण!

Gautam Gambhir: ते दोन चौकार त्याने लगावले नसते तर संजूच्या ९७ धावांची चर्चाच झाली नसती! गंभीरने भलत्याच खेळाडूचं केलं कौतुक, Video Viral

शिवसेनेच्या शहरप्रमुखावर धारधार शस्त्रांनी हल्ला; वाहनाचीही तोडफोड, थोडक्यात वाचला जीव, चौघांना अटक...

Latest Marathi News Live Update : नागपूर कारखान्यातील स्फोट : जोपर्यंत युनिट बंद राहील, तोपर्यंत सर्व कामगारांना त्यांचे पगार मिळत राहतील -बावनकुळे

Sangli ZP: सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड १८ मार्चला; सत्ता स्थापनेचा पेच कायम : राजकीय हालचाली गतिमान

SCROLL FOR NEXT