पुणे

Coronavirus: जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष, भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल

सकाळवृत्तसेवा

नारायणगाव : कोरोनामुळे शेतमालाला उठाव नसल्याने जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष, भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. व्यापारी मात्र पाच ते आठ पट चढ्या बाजारभावाने करीत आहेत. यामुळे व्यापारी मालामाल तर शेतकरी व ग्राहक हवालदिल असे चित्र सध्या दिसत आहेत. 

लाखो रुपयांचा भांडवली खर्च करून पिकविलेल्या फळभाजीपाला व फूल मळ्यांचे नुकसान होत आहे. तालुक्‍यात टोमॅटो, मेथी, फ्लॉवर, कोबी व वेलवर्गीय भाजीपाला पिके काढणीस तयार आहेत. शेतकरी ओतूर येथील उपबाजार आवारात भाजीपाल्याची विक्री करतात. ओतूर येथील भाजीपाला उपबाजार जुन्नर बाजार समितीने बंद ठेवला आहे. मागील आठ दिवसापासून मुंबई, पुणे येथील व्यापारी खरेदीसाठी येत नाहीत. यामुळे भाजीपाला पिकाचे करायचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नारायणगाव येथील टोमॅटो, मेथी व कोथिंबीर उपबाजार सुरू ठेवण्यात आला आहे. मात्र, व्यापारी खरेदीसाठी येण्याचे प्रमाण कमी असल्याने टोमॅटोला प्रतिकिलो दोन रुपये ते पाच रुपये असा भाव मिळत आहेत. 

उत्पादक हवालदिल 
कोथिंबीर व मेथीच्या जुडीला शेकडा पन्नास रुपये ते चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. या बाजारभावात शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च सुद्धा वसूल होत नाही. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला भाव नसताना व्यापारी मात्र भाजीपाला सात ते आठपट चढ्या बाजारभावाने ग्राहकांना विक्री करीत आहेत. शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने खरेदी केलेली टोमॅटो, हिरवी मिरची, फ्लॉवर, कोबी, वालवड, दोडका अनुक्रमे चाळीस, एकशे साठ, ऐंशी रुपये किलो या भावाने व्यापारी विक्री करीत आहेत. शेतकऱ्यांकडून दहा ते वीस रुपये किलो भावाने खरेदी केलेल्या द्राक्षाची विक्री व्यापारी ऐंशी रुपये भावाने करीत आहेत. 

कारवाई करणार 
सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील म्हणाले, ""किरणामालाची जादा भावाने विक्री करणाऱ्या बेल्हे येथील एका व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येकाची जगण्याची लढाई सुुरू असताना व्यापाऱ्यांना समाजाची सेवा करण्याची हीच संधी आहे. व्यापाऱ्यांनी फळ भाजीपाला, किरणा मालाची विक्री रास्त भावाने करावी. अन्यथा, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : दुष्काळ पाहणीसाठी दिवसभर शेतकऱ्यांचा खोळंबा; एकनाथ शिंदे अडीच-तीन तास उशिरा

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT