gram panchayat election
gram panchayat election sakal
पुणे

जुन्नरला आठ ग्रामपंचायतीच्या ११ जागा बिनविरोध

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : (दत्ता म्हसकर) जुन्नर तालुक्यातील पोटनिवडणूक होत असलेल्या ३१ ग्रामपंचायतीपैकी आठ ग्रामपंचायतीच्या ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत अशी माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस व नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी दिली.

बिनविरोध ग्रामपंचायती (कंसात जागा) पुढील प्रमाणे :- राळेगण (१),खोडद (१), हातविज (३),पांगरी तर्फे मढ (१) तांबेवाडी (१) आलमे (१) मांदारणे (१) बुचकेवाडी (२) सात ग्रामपंचायती मधील एकूण १९ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर येथील ७ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती (कंसात जागा व उमेदवार संख्या) पुढीलप्रमाणे :- वारुळवाडी(१-२), नारायणगाव(१-२), गोळेगाव(१-४), बेलसर (१-२), गुळूचंवाडी (१-२), पेमदरा (१-५), बांगरवाडी (१-७).

निमगिरी,पिंपळगाव तर्फे नारायणगाव, आंबेगव्हाण, अहिनवेवाडी, खिलारवाडी, वाणेवाडी, भिवाडे खुर्द, बोतार्डे, काले, अलदरे, सोमतवाडी या ११ ग्रामपंचायती- साठी एकही अर्ज आला नाही.यामुळे येथील पदे पुन्हा रिक्त राहिली आहेत. धालेवाडी तर्फे मिन्हेर ग्रामपंचायतीच्या रिक्त जागेसाठी दाखल केलेले अर्ज उमेदवारांनी माघारी घेतल्याने येथील जागा रिक्त राहीली आहे. आर्वी व हिवरे बुद्रुक येथील निवडणूक रद्द झाली आहे. नामनिर्देशनपत्र ९ डिसेंबर (गुरुवार) मागे घेतल्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदान २१ डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत असून मतमोजणी २२ डिसेंबर (बुधवार) रोजी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT