Junnars representative is irresponsible to plan water says Asha Buchke
Junnars representative is irresponsible to plan water says Asha Buchke 
पुणे

जुन्नरचे लोकप्रतिनिधी पाणी नियोजन करण्यात नालायक : आशा बुचके 

दत्ता म्हसकर

जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. 16 ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप सर्व पक्षीय कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी संतप्त झालेल्या आशा बुचके यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व आमचा लोकप्रतिनिधी पाण्याच्या नियोजनाबाबत नालायक ठरला असून त्यांना नियोजन करता आले नसल्याची बोचरी टीका करत आमदार सोनवणे यांना घरचा आहेर दिला. यांच्यावर करत पाण्याचे तालुक्यात एमआयडीसी नसल्याने संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे, मात्र याची मांडणी लोक प्रतिनिधीने योग्य प्रकारे केली नाही. धरणे आमच्या तालुक्यात असताना इतर जिल्ह्यातील लोकांची दादागिरी खपवून घेणार नाही असे बुचके यांनी बजावले. सत्यशील शेरकर म्हणाले की, मागील आवर्तनाच्या वेळी प्रशासनाने पुन्हा आवर्तन सोडणार नाही, असे सांगून फसवणूक केली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे अन्यथा साम दाम दंड भेदाच्या नीतीचा अवलंब करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अतुल बेनके म्हणाले, कुकडी प्रकल्पाचे तालुक्यातील धरणांबाबतचे नियोजन पूर्ण फसले आहे. हक्काचे पाणी राखू शकलो नाही हे आमच्या तालुक्याचे दुर्दैव आहे. पाण्याबाबत राजकारण कधी केले नाही. जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांना दम देणाऱ्या विरोधात योग्य वेळी भूमिका घेऊ असे आमदार सोनवणे यांचे नाव न घेता बेनके यांनी सांगितले. आमदार शरद सोनवणे पुणे येथे औषध उपचारानिमित्त दवाखान्यात असल्याने ते  उपस्थित राहू शकले नसल्याचे समजते. 

दरम्यान माणिकडोह धरणात सद्यस्थितीत 278 दशलक्ष घनफुट इतका उपयुक्त पाणीसाठा शिलक आहे. यापैकी 150 दशलक्ष घनफुट पाणीसाठा जुन्नर शहर व लाभक्षेत्रातील काही गावांसाठी पिण्यासाठी शिल्लक ठेऊन उर्वरित पाणी या आवर्तनाद्वारे सोडण्यात येणार आहे. आज पासून सुरू झालेले आवर्तन सुमारे सव्वीस तास चालणार असल्याचे सांगण्यात आले. पाणी हे गाळमिश्रित असल्याने ते  पिण्यासाठी किती योग्य आहे असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहेत. पिण्याच्या नावाखाली राजकीय दबावापोटी अन्य जिल्ह्यातील शेती व्यवस्था वाचविण्याचा प्रयत्न यातून होत तर नाही अशी शंका माणिकडोह धरणावर अवलंबित शेतकरी व्यक्त करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT