जुन्नर, ता. १९ : जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केले. यामध्ये शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयातील केतकी उंडे (२५८ गुण), कौशल कबाडी (२५८), कौस्तुभ गवारी (२५४), आराध्य ससाणे (२४८) व तनिष्का तिखे (२२८) यांनी शिष्यवृत्तीत, तर ऋचा उंडे व अवनी काशिद यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
सबनीस विद्यालयातील ईश्वरी दुराफे (२६६), सारंग मडके (२५८), श्रवण पुंडे (२३६), रुद्र साबळे (२३४), देवांश गोडसे (२३४) व सार्थक पुंडे (२१८) यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले. इंग्लिश मीडियम स्कूलचा आर्चिस लोखंडे व अर्णव लोखंडे यांनी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादित केले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका गायत्री काजळे, सुषमा उकिर्डे, हृषीकेश रायकर, आयान शेख यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुधीर ढोबळे, उपाध्यक्ष संजय बुट्टे पाटील, कार्याध्यक्ष राहुल जोशी, सचिव ॲड. अविनाश थोरवे, संचालक नितीन मेहता, संजय मुथा, सुहास भगत, मुख्याध्यापक सदानंद उकिर्डे यांसह शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.