पुणे

पत्रकार संघटनेकडून जुन्नर शहरात मोर्चा

CD

जुन्नर, ता. १७ : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील अंजनावळे येथे एका आढावा बैठकीदरम्यान आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार सुरेश वाणी यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ पत्रकार संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला. सोमवारी (ता. १७) जुन्नर शहरातून काढलेल्या या मोर्चात जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांतील पत्रकारांनी सहभाग घेतला. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या वतीने तहसीलदार रणजीत भोसले यांना निवेदन देत पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे घेऊन पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यासोबतच अंजनावळे येथे झालेल्या बैठकीतील व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग, मोबाइल रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज, तसेच उपस्थित पत्रकार, नागरिक, पोलिस व सरकारी अधिकाऱ्यांचे जबाब तपासण्याची मागणी निवेदनात केली आहे. मोर्चादरम्यान इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अतुल परदेशी यांनी पोलिस अधीक्षक संदिपसिंग गिल यांना थेट दूरध्वनी करून आमदार सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मोर्चानंतर तहसील कार्यालयाच्या परिसरात झालेल्या सभेत पत्रकारांनी भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT