pune sakal
पुणे

मुंढव्यात पाणीगळती दुरूस्त करून रस्त्यावर खड्डा तसाच

अवजड वाहनांमुळे पाईप फुटतो व रस्ता खराब होतो.

कैलास गावडे

मुंढवा : मुंढवा-केशवनगर या मुख्य रस्त्यावरील बधेवस्ती समोर भर रस्त्यात वारंवार २४ वेळा पाणीपुरवठ्याचा पाईप फुटून होणाऱ्या पाणीगळतीसाठी रस्ता खोदाई करून त्याची दुरूस्ती केली गेली. पण प्रत्येक वेळी रस्त्यावरील डांबर उखडून खड्डा पडत असे. वारंवार दुरुस्ती करूनही रस्ता खराब होत असल्याने पंचवीसव्या वेळी पालिकेने खड्डा बुजविण्यासाठी डंबराऐवजी सिमेंटचा वापर करून खड्डा बुजविला. त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड उभे केले. पाच दिवसांनी बॅरिकेड काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. परंतु काही तासातच रस्त्यावर टाकलेले सिमेंट उखडले. त्यामुळे पालिकेने केलेल्या निष्कृष्ठ कामबद्दल नागरिक शंका घेत आहेत.

या ठिकाणी वारंवार रस्ता दुरुस्ती करूनही मुरूम, वाळू, माती वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे पाईप फुटतो व गळती होते. त्यामुळे रस्त्याची वाट लागते. या ठिकाणी सतत दुरुस्ती करूनही रस्ता खराब होत असल्याने प्रत्येक वेळी दुरुस्तीसाठी लागणारा पैसा, वेळ, नागरिकांचा खोळंबा होत आहे. पालिकेने येथे कायमस्वरूपी दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Raigad Women : 'लाडकी बहीण' योजनेतून तब्बल 50 हजार महिलांची नावं वगळली; 'ही' आहेत महत्त्वाची कारणं, यादीत तुमचं तर नाव नाही ना?

Jalgoan News: २५ वर्षीय विवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू, पिंपळनेरमध्ये नातेवाईकांचे आंदोलन, डॉक्टरांवर गंभीर आरोप

Gold Rate Today : सोन्याने घेतली उसळी तर चांदी घसरली ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Iran US Conflict: पश्चिम आशियातील तेल निर्यात रोखू; नाकेबंदीनंतर इराणचा इशारा, अमेरिकेच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT