पुणे

चौधरी छत्तीस कोम समाजाकडून बाणेरमध्ये दुर्गाला श्रद्धांजली

CD

बालेवाडी, ता.२७ : बाणेरमध्ये दुर्गाच्या न्यायासाठी चौधरी छत्तीस कोम समाजाकडून श्रद्धांजली सभा झाली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते .
बाणेर परिसरात दुर्गा चौधरी (वय २०) या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तिच्या मामाच्या घरी तिने आत्महत्या केली आत्महत्या केली की तिची हत्या झाली याबद्दल संभ्रम होता. याबाबत नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपीवर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाबाबत पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी चुनीलाल चौधरी यास अटक केली होती. या घटनेनंतर चौधरी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून दुर्गाच्या न्यायासाठी बाणेरमध्ये श्रद्धांजली सभा झाली. यावेळी दुर्गा ला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणातील दोषींना कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळू नये यावरही समाजाने भर दिला. यावेळी व्यापारी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन निरगुने, रामलाल चौधरी, प्रकाश तापकीर, पुनम विधाते, शिवशरण सिंग, सारंग वाबळे, शिवम बालवडकर आदी उपस्थित होते.

दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी चुन्नीलाल चौधरी यास अटक केली आहे. त्याची पत्नीही यामधे आरोपी आहे. ती गावी गेल्याचे सांगण्यात येत असून तिचा तपास सुरू आहे. सर्व साक्षी, पुरावे, महत्वाचे जबाबही नोंदवून झाले आहेत.
- चंद्रशेखर सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बाणेर पोलीस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update : कांदा खरेदीतील अनियमिततेवर विधिमंडळात अर्धातास चर्चा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Pune Fire News: पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, परिसरात धुराचे मोठे लोट

Horoscope : मार्चच्या पहिल्याच आठवड्यात 4 राशींचा गोल्डन टाईम सुरु ! अचानक धनलाभ आणि करिअरमध्ये यश

SCROLL FOR NEXT