पुणे

काँग्रेस वाकोडे कुटुंबीयांच्या पाठीशी

CD

नवी दिल्ली, ता. ५ : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस कुटुंबीयांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह साहिल वाकोडे आणि अनिकेत अंभोरे यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेतली.
गायकवाड यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. गेल्या १३ महिन्यांत संस्थेतील चार विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असून, त्यांचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. साहिलला न्याय मिळाला पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली. राहुल गांधी यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन काँग्रेस पक्ष कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र गुन्हा दाखल असलेल्या प्राध्यापकांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.
....
दोषींना वाचवण्याचा प्रयत्न; वडिलांचा आरोप
साहिलचे वडील म्हणाले की, माझ्या मुलावर अन्याय झाला असून, दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे; मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले असून, न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका संघातील वनडे सामना दिल्लीतून अचानक हलवला, आता कोणत्या मैदानात होणार मॅच?

CJP Protest: पुन्हा जंतर-मंतर! SIRच्या विरोधात सीजेपीचे ७ नोव्हेंबरला आंदोलन; ठिकाणही ठरले

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

Kumbhephal Accident: कुंभेफळ उड्डाणपुलावर काळाचा घाला! भरधाव चारचाकीच्या धडकेत १३ वर्षीय एकुलत्या एक गौरवचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT