पुणे

समग्र शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीची राज्यसभेत मागणी

CD

PNE26W40210 - खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे

समग्र शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी
खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेत उपस्थित केला मुद्दा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : ग्रामीण, आदिवासी, मागास आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समग्र शिक्षण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज राज्यसभेत अधोरेखित झाली. खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी तारांकित प्रश्न क्रमांक १८७ द्वारे समग्र शिक्षण अभियान आणि लैंगिक समावेशन निधीच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारकडे माहिती मागवित, मुलींच्या शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केला.
विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी नवीन शाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांचा विस्तार, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा व वसतिगृहे, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, वाहतूक सुविधा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा, व्यावसायिक शिक्षण आणि माहिती-तंत्रज्ञानाधारित शिक्षण सुविधा राबविण्यात येत असल्याचे उत्तर सरकारतर्फे देण्यात आले. लैंगिक समावेशन निधीअंतर्गत मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, ग्रामीण व वंचित भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला जात असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

चौकट...
२०२६-२७ मध्ये ३९० कोटींचा केंद्रीय निधी
केंद्र सरकारने लेखी उत्तरात सांगितले की, समग्र शिक्षण ही केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यांच्या सहभागातून तिची अंमलबजावणी केली जाते. शाळांच्या गरजेनुसार वर्गखोल्या, पायाभूत सुविधा, शैक्षणिक साहित्य आणि इतर विकासकामांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. महाराष्ट्राला २०२५-२६ या आर्थिक वर्षात शालेय पायाभूत सुविधांसाठी ३९८.०६ कोटी रुपये, तर २०२६-२७ मध्ये ३९०.७५६ कोटी रुपयांचा केंद्रीय निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्राने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: शरद पवार करणार दुष्काळाची पाहणी; राज्यात २८ सप्टेंबरपासून दौरा; शेतकऱ्यांशी थेट संवाद

Bangladesh MP Arrested : ७५ वर्षीय खासदाराच्या १९ वर्षीय पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; घटनास्थळी चिठ्ठी सापडली अन्, खासदाराला पोलिसांकडून अटक

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

SCROLL FOR NEXT