Jyotsna Ekbote and Sangeeta Jagtap elected to Management Council of pune University sakal
पुणे

Pune University : विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर ज्योत्स्ना एकबोटे आणि संगीता जगताप यांची निवड

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या दोन सदस्यांची बिनविरोध निवड

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या प्राध्यापिका संगीता जगताप यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. या अंतिम टप्प्यातील बिनविरोध निवडीने विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेची सांगता झाली.

विद्यापीठाच्या विद्या परिषदेतून निवडून देण्यात येणाऱ्या दोन सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू होती. एकबोटे यांची महिला गटातून, तर जगताप यांची निर्वाचित अध्यापक गटातून बिनविरोध निवड झाली आहे.

व्यवस्थापन परिषदेवर विद्या परिषदेतून दोन सदस्य निवडून द्यायचे होते. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. छाननीमध्ये चार जणांचे अर्ज बाद करण्यात आले. त्यानंतर अध्यापक गटातून तिघांचे तर महिला गटातून चौघांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले.

महिला गटातून ज्योत्स्ना एकबोटे यांच्यासह पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या संगीता जगताप, आदर्श शिक्षण मंडळीच्या आदर्श महाविद्यालयाचे राजश्री जायभाय आणि समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील वीणा नरे यांचा अर्ज होता.

संगीता जगताप आणि राजश्री जायभाय यांचा अध्यापक गटातूनही अर्ज होता. या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. त्यावेळी महिला गटातून तीन अर्ज मागे घेण्यात आले.

त्यात जगताप यांनी देखील महिला गटातून अर्ज मागे घेतला. तर अध्यापक गटातूनही संबंधित उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे एकबोटे आणि जगताप यांची बिनविरोध निवडणूक झाली. व्यवस्थापन परिषदेच्या या निवडीनंतर विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेची सांगता झाली.

‘‘महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विद्यापीठाची आणि सर्वात जास्त मतदारांची कागदविरहित निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला यश आले आहे. निवडणुकीदरम्यान एकही तक्रार अथवा वाद न होता, ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

जवळपास ९० टक्के निवडणूक बिनविरोध झाली. याबाबत सर्व घटकांचे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने ऋण व्यक्त करत आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठाचे हे यश अधोरेखित करण्यात आले आहे.’’

- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT