पाबळ, ता. १७ : पाबळ परिसरात कामानिमित्त जात असलेल्या तरुणाची मोटार अडवून त्याला लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. १२) खैरेनगर (ता. शिरूर) येथे घडली. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला व हातपायांना दुखापत झाली असून, हल्लेखोरांनी मोटारीचीही तोडफोड केली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात पाच अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैरेनगर (ता. शिरूर) येथे दोन दिवसांपूर्वी सोमेश शिवाजी गीते याची एका हॉटेलमध्ये काही तरुणांशी वाद झाले होते, त्यांनतर सोमवारी (ता. १२) सोमेश हा त्याच्या ताब्यातील मोटारमधून कान्हूर मेसाई- खैरेनगर रस्त्याने चाललेला असताना मागून मोटारमधून वाद झालेले पाच तरुण आले. त्यांनी सोमेशला अडवून दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी गजाने मारहाण करत जखमी केले, दरम्यान त्यांनी मोटारीच्या काचा फोडून मोटार उलटी करून नुकसानही केले. याबाबत सोमेश शिवाजी गीते (वय ३२, रा. गीतेवस्ती-मलठण, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी पाच अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार निखिल रणदिवे पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.