पुणे

पारनेर -महिलेचा खून उद्या रस्ता रोको

CD

महिलेच्या खून प्रकरणी
सुपेत आज रास्तारोको

पारनेर, ता. ८ : जोपर्यंत आरोपींना अटक करून त्यांची नावे जाहीर होत नाहीत, तोपर्यंत कडूस येथील खून झालेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, तसेच रविवारी (ता.९) सुपे चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, अशी भूमिका कडूस ग्रामस्थ व महिलेच्या नातेवाइकांनी घेतली आहे.
कडूस येथील मानसिक रुग्ण असलेल्या उषा पांडुरंग शिंदे या मानसिक रुग्ण महिलेचा अज्ञात आरोपींनी डोक्यात दगड घालून खून केला होता. पुढे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक व ग्रामस्थांनी नकार दिल्याने मृतदेह अहिल्यानगरच्या सरकारी दवाखान्याच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. त्या घटनेला आता तीन दिवस होत आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी गंभीर झाले आहे. दरम्यान, आज सकाळी कडूस येथे ग्रामसभा झाली. या सभेत सुपे येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा व गावबंद ठेवून या घटनेचा निषेधही करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: शिक्षणासाठी पैसा खर्च करता, पण रोजगाराचे मार्ग बंद; हजार युवांपैकी फक्त १२ जणांना कायमची नोकरी, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

Shirur News : हाताच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु; महिलेच्या कुटूंबियांचा आक्रोश

ऐकावं ते नवलंच! श्वानासारखं दिसण्यासाठी २६ वर्षीय तरुणाने खर्च केले तब्बल २२० कोटी रुपये; पाहा VIDEO

Shirur News : घोडनदीच्या पूलावरून पात्रात उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

Latest Marathi News Live Update : स्कूलबसच्या चाकाखाली आल्याने चिमुकलीचा मृत्यू, अमरावती जिल्ह्यातील घटना, पालक आक्रमक

SCROLL FOR NEXT