पुणे

जेजुरीत दीड लाखांच्या रोकडसह मिठाई लंपास

CD

जेजुरी : जेजुरी-सासवड मार्गावरील लवथळेश्वर परिसरातील काका हलवाई स्वीट सेंटरचे शटर उचकटून अज्ञात तीन चोरट्यांनी १ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यामध्ये दीड लाख रुपयांची रोकड आणि सहा किलो मिठाईचा समावेश असून, ही घटना शुक्रवारी (ता. ४) पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली. याबाबत दुकानमालक अक्षय दत्तात्रय भोईटे (वय ३०, रा. नाझरे कॉलनी, नाझरे, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ३) जमा झालेली दीड लाख रुपयांची रोकड कंपनीला देण्यासाठी दुकानाच्या काउंटरमध्ये ठेवली होती. रात्री सव्वाअकराच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले होते. शुक्रवारी सकाळी दुकानाचे शटर उचकटल्याचे निदर्शनास आले. भोईटे, त्यांचे बंधू आकाश व व्यवस्थापक निखिल कुदळे यांनी पाहणी केली असता, १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि काजू बर्फी, काजू गजक, काजू चोकोबाईट अशी ९ हजार ६०० रुपये किमतीची सहा किलो मिठाई चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला मास्क लावलेले तीन चोरटे दुचाकीवरून आल्याचे आणि चोरी करून पसार झाल्याचे दिसत आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Diesel Price: अमेरिकेला महागाईच्या झळा! 'डिझेल'च्या दरांमध्ये ऐतिहासिक वाढ; दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्या

मुंबईत आरे मेट्रो स्टेशनखाली भीषण आग, लक्झरी बसने अचानक घेतला पेट, धक्कादायक VIDEO समोर...

Marathi News Live Updates : काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी 7 जणांना अटक

Vaibhav Sooryavanshi साठी BCCI चा मास्टरप्लान! सचिवांचा खुलासा, 'तो केवळ एका सीझनचा स्टार राहू नये...'

DWIDHA MOVIE REVIEW: वडील आणि मुलीच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत दाखवणारा, मनाला भिडणारा चित्रपट ‘द्विधा’

SCROLL FOR NEXT