वडगाव मावळ, ता. १९ : येथे गेल्या महिनाभरापासून भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या काकड आरती सोहळ्याची सांगता मंगळवारी (ता. २४) दिलीप महाराज खेंगरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असल्याची माहिती श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे व सचिव अनंता कुडे यांनी दिली.
येथील श्री दत्त मंदिरात देवस्थान ट्रस्ट व काकड आरती भजनी मंडळाच्या वतीने गेल्या महिनाभरापासून काकड आरती सोहळा सुरू आहे. दररोज पहाटे शेकडो भाविक या सोहळ्यात सहभागी होत आहेत. विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय असतो. दररोज मानकरी कुटुंबांच्या हस्ते काकड आरती होत आहे. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, मंदिर परिसरात सुबक रांगोळ्या व भक्तिमय वातावरणात गेल्या महिनाभर हा सोहळा सुरू आहे. या काकड आरती सोहळ्याची सांगता मंगळवारी (ता. २४) होणार आहे. त्यानिमित्त सकाळी ९ ते ११ या वेळेत दिलीप महाराज खेंगरे यांचे काल्याचे कीर्तन, ११ ते १ पालखी दिंडी प्रदक्षिणा व दुपारी १ ते ३ काल्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य विश्वस्त किरण भिलारे यांनी केले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.