पुणे

बिरंगुडी परिसरात विद्युतपंप चोरांचा उच्छाद

CD

कळस, ता. २० : गेल्या काही दिवसांपासून बिरंगुडी (ता. इंदापूर) परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युतपंप आणि सौरपंप चोरून नेले आहेत. अवघ्या महिनाभरात येथील ६ ते ७ शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युतपंप चोरट्यांनी लंपास केले आहेत.
आधीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
या वर्षी पावसाअभावी परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकरी विहीर आणि विंधनविहिरीतील उपलब्ध पाण्याचा वापर करून धडपड करत आहेत. मात्र, अशा कठीण परिस्थितीत आता चोरट्यांच्या त्रासाने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढवली आहे. गेल्या महिनाभरापासून चोरटे रात्रीच्या वेळी शेतातील विहिरींवरून वीजपंप, सौरपंप आणि त्यांच्या केबल चोरून नेत आहेत.

चोरट्यांकडून विद्युतपंप चोरीचा प्रकार शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे. उपलब्ध पाण्याचा थेंब-थेंब पिकाच्या बुडापर्यंत पोचविण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीला चोरटे ब्रेक लावत आहेत. यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील धनाजी सांगळे, रमेश सांगळे, सुखदेव खारतोडे, प्रमोद लोंढे, अप्पा आवाळे या शेतकऱ्यांचे विद्युतपंप चोरीला गेले आहेत.


रात्री आमच्या विहिरीवरून पाच अश्वशक्तीचा विद्युतपंप व त्याची केबल चोरट्यांनी चोरून नेली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि विद्युतपंप चोरणाऱ्या टोळीचा तातडीने छडा लावून त्यांचा बंदोबस्त करावा.
- संभाजी सांगळे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT