पुणे

पाणीटंचाईने कळसकरांची परवड

CD

कळस, ता. १५ : कळस (ता. इंदापूर) येथील अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनी तळ गाठल्याने, गावात होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. तीन दिवसांतून दोन तास विद्युतपंप सुरू राहण्यापुरतेच विहिरींमध्ये पाणी येत असल्याने, ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
सध्या गावात प्रत्येक वितरिकेला तीन-चार दिवसांतून एकदा अपुऱ्या दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी परवड सुरू आहे. यामुळे गावात तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
यंदा या परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अशात गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेच्या विहिरींलगतचा पाझर तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. यामुळे विहिरींची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. परिणामी गावातील अंतर्गत पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. दररोज वापरासाठी पाण्याची निकड जाणवत असताना, तीन-चार दिवसांतून एकदा व अपुरे मिळणारे पाणी पुरवायचे कसे असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

कोट्यवधींचा निधी, तरीही टँकरची मागणी
यंदा मे महिन्यात गावात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यापर्यंत ग्रामस्थांना टँकरने पुरवठा केला जात होता. मात्र टँकर बंद होऊन महिनाभराचा कालावधी उलटण्याआधीच गावातील पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. यामुळे गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. परंतु काही वर्षांपूर्वी गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्याच्या उद्देशाने मंजूर झालेल्या सुमारे २७ कोटी रुपये खर्चाच्या हर घर जल योजनेतून पाणीपुरवठा कधी होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, योजनेतून खोदलेली विहीर तुडुंब भरलेली आहे. शिवाय विहिरीपासून साठवण टाकीपर्यंत जलवाहिनी गाडली असल्याचे बोलले जाते. मग योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यास किती कालावधी लागणार याचे उत्तर कोणाकडे नसल्याचे स्पष्ट होत आहे. एकंदरीत या योजनेतून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता की ठेकेदाराचे भले करण्याचा? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.


गावातील पाणीटंचाईचे वास्तव विचारात घेऊन ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. यावर निर्णय झाल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा होऊ शकतो.
- गणेश जाधव, ग्रामपंचायत अधिकारी


03710

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT