पुणे

वाहतूक सुरळीत होईपर्यंत काळेबोराटेनगर येथील रेल्वे फाटक बंद करू नये

काळेबोराटेनगर येथील रेल्वे गेटजवळ भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने गेट बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

- अशोक बालगुडे

उंड्री - काळेबोराटेनगर येथील रेल्वे गेटजवळ भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने गेट बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईपर्यंत रेल्वेगेट बंद करू नये, असे पत्र मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काळेबोराटेनगर येथील रेल्वेगेट बंद करण्यासाठी भुयारी मार्ग केला आहे. मात्र, अद्याप वाहतूक सुरळीत झाली नाही. याविषयी रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली आहे. वाहतूक सुरळीत झाल्यानंतर रेल्वेगेट बंद करता येईल. सध्या काळेबोराटेनगर येथील रेल्वेगेट तातडीने बंद न करता वाहतूक सुरळीत होईपर्यंत खुले ठेवण्यासंबंधी रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, असे त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

स्थानिक रहिवासी राहुल काळे, अजय न्हावले, गणेश बोराटे म्हणाले की, काळेबोराटेनगर येथील भुयारी मार्गावरील रस्त्यावर मागिल महिन्यामध्ये चोरीच्या व महिलांना छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत. विद्युत दिवे नाहीत, अशास्त्रीय पद्धतीचे गतीरोधक आणि खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

संगणक अभियंता स्नेहा वाडकर म्हणाल्या की, गृहिणींबरोबरच नोकरदार महिला या रस्त्याने ये-जा करीत असल्याने त्यांना असुरक्षित वाटू लागले आहे. त्यामुळे भुयारी मार्गावर विद्युत दिवे बसवावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलिसांची गस्त वाढवावी, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.

योगेश सूर्यवंशी आणि अमोल बोराटे म्हणाले, की रेल्वे प्रशासनाने पूर्व सूचना न देता रेल्वे गेट बंद करून नागरिकांची गैरसोय केली आहे. रेल्वेगेट बंद केल्यानंतर वाहतुकीचे नियोजन करावे, तशा प्रकारचे सूचना फलक लावणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil Fact Check : 'भाकरी करपली नाहीच' आयपीएस विश्वास नांगरे पाटलांनी कविता लिहली की नाही?, महाराष्ट्र सरकारकडून फॅक्ट चेक

INDIA SQUAD VS AFGHANISTAN: भारताच्या संघात गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन... वन डेत ४, तर कसोटीत ७ खेळाडू

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

SCROLL FOR NEXT