पुणे

कळंबच्या मेळाव्याला ८१३ विद्यार्थ्यांना नोकरी

CD

वालचंदनगर, ता. ५ : कळंब (ता. इंदापूर) येथील फडतरे नॉलेज सिटीमध्ये आयोजित केलेल्या नोकरी मेळाव्यामध्ये पुणे, साेलापूर, सातारा जिल्ह्यांतील इंदापूर, बारामती, फलटण, माळशिरस, श्रीगोंदा व पंढरपूर तालुक्यातील ११२७ विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील ८१३ विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली.
कळंबमध्ये स्वर्गीय साहेबराव फडतरे यांच्या ४४ व्या पुण्यस्मरणार्थ भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, फलटण, माळशिरस, श्रीगोंदा व पंढरपूर तालुक्यातील ११२७ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरींग, फार्मसी, आय.टी.आय, ए.बी.ए, एम.सी.ए तसेच दहावी व बारावी पास झालेले विद्यार्थी सहभागी झाले होते.
मेळाव्यामध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा, भारत फोर्ज, पियाजो व्हेईकल, फियाट, कमिन्स, नॅशनल इंडस्ट्रिज, शिवप्रसाद डेअरी, नेचर डिलाईट डेअरी, सोनाई डेअरी, फडतरे इंजिनिअरिंग वर्क्स, ए. सी. एस. इंडस्ट्रीज अशा कंपन्या सहभागी झाल्या होत्या. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सर्व विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची निवड करून नोकरीची संधी दिली. यावेळी फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रेय फडतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जय फडतरे, कल्याणी फडतरे, इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सोनाली देशमुख उपस्थित होते. नोकरी मेळावा यशस्वी होण्यासाठी प्लेसमेंट ऑफिसर उदय चव्हाण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गणेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update :मध्य रेल्वे मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून १.३१ कोटी रुपये दंड वसूल बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

SCROLL FOR NEXT