Ajit Pawar sakal
पुणे

पुणे : अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची आज बैठक

पुणेकरांच्या पाणी पुरवठ्याबाबत यामध्ये निर्णय होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात एकीकडे पाणी टंचाई आणि दुसरीकडे पाटबंधारे विभागाचा पाणी वापर करा असा दबाव असताना उद्या धरणातील पाणी साठ्याचे उन्हाळ्यासाठी नियोजन पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक होत आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पाणी पुरवठ्याबाबत यामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. पण शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये असमान पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. समान पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होई पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, राज्य शासनाने मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा जास्त पाणी धरणातून उचलले जात आहे. हा पाणी वापर कमी करावा असे आदेश पाटबंधारे विभागासह जलसंपत्ती नियामक प्राधिकरणानेही दिले आहेत. पण शहराची वाढत जाणारी हद्दी, लोकसंख्या यामुळे पाणी कपात करणे शक्य नाही.

यंदा खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणात १५.३८ टीएमसी पाणी शिल्लक असून, गेल्यावर्षी १७.२ टीएमसी पाणी होते. या १५. ३८ टीएमसची पाण्याचे जून अखेरपर्यंतचे नियोजन केले जाणार आहे. त्यामध्ये पुणे शहराचे पाणी, शेतीचे आवर्तन व उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन याचा विचार करून पाण्याचे नियोजन ठरण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT