पुणे

आमदाराला गोळी घालून मारण्यासाठी चालकाला पैशाची ऑफर

CD

आमदार कल्याणशेट्टी यांना गोळी घालून
मारण्यासाठी चालकाला पैशाची ऑफर

सदर बझार पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा; फुलारीला अटक, उद्यापर्यंत पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १० : अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना व त्यांची पत्नी, मुलाला गोळी घालून मारण्याची ऑफर त्यांच्याच चालकास देणाऱ्या दोघांवर सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यातील प्रभाकर फुलारी (वय २३, रा. मल्लिकार्जुन नगर, सोलापूर) यास पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
शुक्रवारी (ता. ७) दुपारी पावणेचारच्या सुमारास आमदार कल्याणशेट्टी हे त्यांची पत्नी व मुलासह सोलापुरातील महावीर चौकातील प्युमा शोरूममध्ये नवीन गाडी खरेदीसाठी आले होते. त्यावेळी आमदारांचा चालक गाडीत बाहेरच थांबला होता. त्याठिकाणी श्रीशैल हुळ्ळी (रा. वडगाव, ता. दक्षिण सोलापूर) व प्रभाकर फुलारी हे दोघे आले. श्रीशैल हुळ्ळी याने आमदार कल्याणशेट्टी यांचा चालक फिर्यादी आनंद स्वामीराव सुरवसे (रा. मोट्याळ, ता. अक्कलकोट) यास ‘तुला पैसे देतो तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, मी पुढचे बघतो’, अशी ऑफर दिली. त्यावेळी ‘तुला साहेब काय म्हणतात नीट ऐक, त्यात तुझा फायदा आहे’ असे फुलारी म्हणाला. त्यांनी पैशांचे आमिष दाखवून आमदार कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून जीवे ठार मारण्यासाठी ऑफर दिल्याची फिर्याद चालक आनंद सुरवसे यांनी पोलिसांत दिली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल सावंत करीत आहेत.
------------------------
चौकट
वडगावचा हुळ्ळी तडीपारीतील आरोपी
मूळचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव येथील श्रीशैल हुळ्ळी याची ‘वाळू माफीया’ अशी त्या भागात ओळख आहे. वळसंग पोलिसांत याच्याविरोधात सहा ते सात गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षकांनी हुळ्ळीवर तडीपारीची कारवाई केली होती. त्याने तडीपारीचा आदेश मोडल्याने दोनवेळा पुन्हा वळसंग पोलिसांत गुन्हे दाखल झाले. आता त्याने आमदार कल्याणशेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
--------------------
चौकट
हुळ्ळी याच्याकडे विनापरवाना बंदुक?
आमदार कल्याणशेट्टी यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या श्रीशैल हुळ्ळी याच्याकडे विनापरवाना बंदुक असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्याने विद्यमान आमदाराला अशी धमकी कोणाच्या सांगण्यावरून आणि का धमकी दिली, या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यातच आहेत. अटकेतील फुलारी अजूनही पोलिसांना काही सांगत नाही. त्यामुळे पोलिस आता मुख्य संशयित हुळ्ळी याचा शोध घेत आहेत. त्यासाठी सदर बझार पोलिसांची दोन आणि शहर गुन्हे शाखेची दोन पथके रवाना झाली आहेत.
-------------------
चौकट
फुलारीला एसटी बसचा पाठलाग करून पकडले
आमदार कल्याणशेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन दोन्ही संशयित आरोपी दोन वेगवेगळ्या वाहनांमधून पुण्याच्या दिशेने पसार झाले. गोपनीय बातमीदार व मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी प्रभाकर फुलारी याचा ठिकाणा शोधला. तो पुण्यावरून एसटी बसमधून पुण्याच्या दिशेने येत होता. इंदापूर टोल नाका ओलांडून बस सोलापूरच्या दिशेने येत होती. सदर बझार पोलिसांच्या पथकाने त्या गाडीचा अंदाज घेऊन बस थांबवली. साध्या पोशाखातील पोलिस बसमध्ये चढले आणि त्यांच्याकडील फोटोवरून त्यांनी रविवारी (ता. ९) मध्यरात्री दीडच्या सुमारास फुलारीला पकडून सोलापुरात आणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Ticket Booking: रेल्वेच्या ऑनलाइन बूकिंगचा बोजवारा, ऐन दिवाळीत सिस्टिम बंद; प्रवाशांचे हाल

Crime News : धक्कादायक घटना ! पोलिसांची गाडी पाहून तरुणांनी तलावात मारल्या उड्या; तिघांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

कधी मिशीला पीळ, तर कधी हात हातात; ‘सैराट’मधील आर्चीच्या बाबांचा पत्नीसोबत रोमँटिक अंदाज, दिवाळीचे खास फोटो

IND vs UAE: आर्यवीर सेहवागचे वडिलांच्या पावलावर पाऊल! U19 Asia Cup मध्ये ठोकलं खणखणीत शतक

Latest Marathi News Live Update: सुनेत्रा पवार आणि तटकरे यांच्यात ४५ मिनिटे चर्चा

SCROLL FOR NEXT